अभियंता इस्थर अनुह्या हत्या प्रकरणात पोलिसांना घटनास्थळी एक बॅग सापडली असून त्यात काही कपडे सापडले आहेत. त्याचा या हत्या प्रकरणाशी काही संबंध आहे का, त्याचा पोलीस तपास करत आहेत.
 लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकातून ५ जानेवारी रोजी इस्टार अनुह्या (२३) ही तरूणी बेपत्ता झाली होती. ११ दिवसानंतर तिचा मृततेह कांजूर महामार्गाजवळील झुडपात सापडला होता. घटनास्थळी पोलिसांना एक चादर सापडली. त्यावर रक्ताचे डाग होते. रात्रीच्या वेळी थंडीपासून बचाव करण्यासाठी रिक्षाचालक अशी चादर वापरतात. मंगळवारी सुद्धा काही अंतरावर पोलिसांना एक जुनाट बॅग सापडली. त्यात पुरूषाचे अंतर्वस्त्र आणि शर्ट आहे. या शर्टावर भांडुप येथील एका टेलरचे लेबल आहे. या बॅगेचा आणि हत्येचा काही संबंध आहे का ते आताच सांगणे कठीण आहे, असे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.