उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली कार सापडल्यानंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे सर्वात प्रथम तिथे कसे पोहोचले? असा सवाल विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. याशिवाय गाडीचा मालक मनसुख हिरेन यांच्यासोबत सचिन वाझे यांच्यात संपर्क झाल्याचा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या सर्व आरोपांवर सचिन वाझे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या गाडीच्या मालकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

jitendra awhad replied to sadabhau khot
सदाभाऊ खोतांच्या शरद पवारांवरील ‘त्या’ टीकेला जितेंद्र आव्हाडांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “लटकवलेली चावी जो नेतो….”
Nandurbar, Heena Gavit,
नंदुरबारमध्ये डॉ. हिना गावित यांच्यासमोर स्वपक्षीय, मित्रपक्षांच्या नाराजीचे आव्हान
jitendra awad challenge to ajit pawar
“अजित पवारांच्या डोक्यातलं विष बाहेर आलं”, ‘द्रौपदी’वरच्या विधानावरुन जितेंद्र आव्हाडांची टीका
Caste end thought of Babasaheb Ambedkar and Mahatma Jyotiba Phule
फुले-आंबेडकरांचा जाती-अंत विचार

“मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाबाबत मला काहीच माहित नाही. मला आताच कळलं अशून ठाण्याला जाण्यासाठी निघालो आहे,” असं सचिन वाझे यांनी सांगितलं आहे. यावेळी त्यांनी मनसुख हिरेन यांनी तीन दिवसांपूर्वी तक्रार केली होती अशी माहिती दिली. “मनसुख हिरेन यांनी पोलीस आणि पत्रकार त्रास देत असल्याचं म्हटलं होतं. एका पत्रकाराने रात्री उशिरा फोन करून पोलीस तुम्हाला संशयिताच्या नजरेने पाहत असल्याचं म्हटलं होतंअसं त्यांनी तक्रारीत सांगितलं,” असल्याची माहिती सचिन वाझे यांनी यावेळी दिली.

“क्रॉफर्ड मार्केटमध्ये भेट झालेली ‘ती’ व्यक्ती कोण?,” अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकं प्रकरणी फडणवीसांचे गंभीर आरोप

सचिन वाझे यांना यावेळी पत्रकारांनी फडणवीसांनी केलेल्या आरोपांबद्दल विचारताना तुमचं आणि हिरेन यांच्यात आधी बोलणं झालं होतं का? असं विचारलं असता त्यांनी तुम्ही त्यांनाच विचारा. मला याबाबत काहीच माहिती नाही असं सांगत त्यांना आरोप करू द्या असं म्हटलं. “माझ्या आधी तिथे अनेक यंत्रणा होत्या. गावदेवीचे वरिष्ठ पोलीस अधिकारी, वाहतूक पोलीस अधीक्षक, डीसीपी झोन-2 आणि बीडीडीएस पोहोचले होते. त्यानंतर क्राइम ब्रांचचं युनिट पोहोचलं होतं त्यात मी होतो,” अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.

फडणवीसांनी काय म्हटलं आहे –
“मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एक गाडी सापडली. हा घटनाक्रम संशय निर्माण करणारा आहे. वाहन सापडल्यावर टेलीग्रामवर एक ग्रुप तयार झाला आणि त्यावर एक पत्र आले ‘जैश उल हिंद‘ नावाने. एक क्रिप्टो करंसी अकाऊंट दिले होते. पण तसे कुठले खातेच नव्हते,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी धमकीचं पत्र वाचून दाखवत सांगितलं की, “यामधून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ही एकच गाडी तिथे आली नव्हती, त्या ठिकाणी दोन गाड्या आल्या होत्या. या दोन्ही गाड्या एकाच मार्गाने आल्या असून ठाण्यातूनच आल्या आहेत. गाडी ओळखल्याबरोबर पोलीस अधिकारी सचिन वाझे पहिल्यांदा पोहोचले. कोणीही पोहोचण्याआधी ते पोहोचले नंतर क्राइमचे, स्थानिक पोलीस ठाण्याचे आणि इतर लोक आले. नंतर सचिन वाझे यांनी तपास अधिकारी म्हणून नेमण्यात आलं. तीन दिवसांपूर्वी एका एसीपीला तपास अधिकारी म्हणून नेमलं असून, सचिन वाझेंना का काढलं? हे समजलं नाही”.

पुढे ते म्हणाले की, “योगायोग म्हणजे ज्यांची गाडी चोरीला गेली, त्यांच्याशी एका क्रमांकावर अनेक वेळा संवाद झाला आहे. सचिन वाझे यांचा तो नंबर असल्याचं समोर आलं आहे. ज्या दिवशी गाडी ठाण्याला बंद पडली, त्यानंतर ओला घेऊन तो कॉफर्ड मार्केटला गेला. तिथे तो एका व्यक्तीला भेटला. ती व्यक्ती कोण हा माझा प्रश्न आहे. कोणाला तो भेटला, हे जर काढलं तर अनेक गोष्टी स्पष्ट होतील”.

“ज्या ओलामध्ये बसून गेला त्याचं रेकॉर्ड आहे. तो कोणाला भेटला हे ओला कॅब चालकाने पाहिलं आहे. अशा परिस्थितीत वाझे ठाण्यातील, गाडी ठाण्यातील आणि या दोघांचे आधीपासून संवाद हे खूपच योगायोग असून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. गाडी दिसल्याबरोबर वाझे तिथे पोहोचले. धमकीचं पत्रही सचिन वाझे यांना प्राप्त झालं. त्यांनीच ते टेलीग्रामवर टाकलं. शंकेला वाव देणारे बरेच पुरावे आहेत. त्यामुळे ही संपूर्ण चौकशी एनआयएला द्यावी, अशी आमची मागणी आहे,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.