फेसबुकवर विकृत छायाचित्र प्रसिद्ध करून अल्पसंख्याक समाजाच्या भावना दुखविणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. समाजात तेढ निर्माण करणे, माहिती व तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असे कल्याणमधील बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक आर. आर. पाटील यांनी सांगितले.
या छायाचित्रामुळे अल्पसंख्याक समाजाच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे भिवंडी परिसरात गुरुवारी तणाव झाला होता. फेसबुकवरील छायाचित्रात एका समाजाच्या प्रार्थनास्थळाची विटंबना करण्यात आली असल्याची माहिती काशिद नानजी यांनी माजी उपमहापौर जावेद जवने यांना दिली. नंतर जावेद यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
संग्रहित लेख, दिनांक 30th Mar 2013 रोजी प्रकाशित
फेसबुकप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा
फेसबुकवर विकृत छायाचित्र प्रसिद्ध करून अल्पसंख्याक समाजाच्या भावना दुखविणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. समाजात तेढ निर्माण करणे, माहिती व तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत,
First published on: 30-03-2013 at 02:43 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police register case against unknown person who upload distorted picture on facebook