मुंबई : साकीनाका येथे २० वर्षीय तरूणाच्या आत्महत्येप्रकणी पवई पोलिसांनी मैत्रिणीविरोधात गुन्हा दाखल केला. मैत्रिणीने गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन एक लाखांची मागणी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> मंत्रालय क्रेडिट सोसायटी फसवणुकीप्रकरणी २६ जणांविरोधात गुन्हा; बायोमेट्रीक हजेरीत हेराफेरी करत ६३ लाखांच्या फसवणुकीचा आरोप
साकीनाका येथील रहिवासी असलेल्या २० वर्षीय प्रथम होवाळ याने १ नोव्हेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यावेळी मृत तरूणाचे वडील सचिन होवाळ यांनी मित्रांकडे चौकशी केली असता प्रथमची मैत्रिण खरेदी करण्यासाठी, तसेच तक्रार मागे घेण्यासाठी पैशांची मागणी करीत असल्याचे सांगितले. प्रथमच्या एका मित्राने याबाबत पुरावा म्हणून दोघांमधील संभाषणाची ध्वनीफीतही कुटुंबियांना दिली. त्यानंतर प्रथमचे वडील सचिन होवाळ यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी प्रथमच्या मैत्रिणीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.