मुंबई  : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या समाजमाध्यमांवरील व्यासपीठाचा आरंभ पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आणि पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. सह्याद्री अतिथिगृह येथे झालेल्या या कार्यक्रमास पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब जऱ्हाड, सदस्य सचिव अशोक शिनगारे, साहाय्यक सचिव (तांत्रिक) पुंडलिक मिराशे आदी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील एक ते दीड वर्ष आपण करोनाचा सामना करत असतानाही माझी वसुंधरा अभियान, कांदळवनांचे संरक्षण, जंगलांची वाढ यासाठी काम करत आहोत. पर्यावरण संरक्षणाच्या बाबतीत महाराष्ट्र जगाला मार्ग दाखवू शकतो. यामध्ये समाजमाध्यम हे महत्त्वाचे साधन असणार आहे. समाजमाध्यमे ही वर्तमानातील आरसा असून आपल्या कामाचे प्रतिबिंब त्यात दिसून येत असते. म्हणून या माध्यमातून जास्तीत जास्त लोकसंवाद साधणे आवश्यक आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

जगभरात कोठेही घडलेली घटना क्षणभरात समाजमाध्यमांद्वारे जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचते. म्हणूनच हे महत्त्वाचे माध्यम झाले आहे. आता प्रदूषण नियंत्रण मंडळ समाजमाध्यमावर आल्याने  पर्यावरण संरक्षण आणि प्रदूषण नियंत्रणविषयक माहिती आणि जनजागृतीसाठी त्याचा व्यापक उपयोग होईल, अशी अपेक्षा संजय बनसोडे यांनी व्यक्त के ली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ट्विटर हॅन्डल आणि इन्स्टाग्राम @mpcb_official   या नावाने तर फेसबुक खाते MAHARASHTRA POLLUTION CONTROL BOARD  या नावाने कार्यरत झाले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pollution control board on social media akp
First published on: 02-09-2021 at 01:07 IST