हितेंद्र ठाकूर आमदार, त्यांचा मुलगा क्षितीज आमदार तर पत्नी प्रवीणा महापौर, वसई-विरारमध्ये सारीच महत्त्वाची पदे ठाकूर यांच्या कुटुंबियांकडेच केंद्रीत झाली आहेत. वसई-विरार महापालिकेच्या महापौरपदासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत प्रवीणा  यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला. ठाकूर यांना १०८ तर शिवसेनेचे किरण चेंदवणकर यांना फक्त सहा मते मिळाली. उपमहापौरपदी बहुजन विकास आघाडीचेच उमेश नाईक यांची निवड झाली. वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीत ११५ पैकी १०६ जागाजिंकून ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने  वर्चस्व प्रस्थापित केले होते. महापौरपद पत्नीकडे सोपावून वसईतील सारी महत्त्वाची पदे आपल्याच घरात राहतील याची खबरदारी ठाकूर यांनी घेतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pravina thakur new mayor of vasai virar
First published on: 30-06-2015 at 12:01 IST