सिग्नललाच प्रवासी थांबा बनवणाऱ्या चालकांकडे पोलिसांचे दुर्लक्ष

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरात खासगी बसगाडय़ांच्या अनधिकृत पाìकगचा प्रश्न गंभीर होत असतानाच दादार टीटी परिसरातील सिग्नलनाच खासगी बसगाडय़ांनी प्रवासी थांबा बनवल्याचे चित्र आहे. परगावी जाणाऱ्या या बस सिग्नलवरच २० ते ३० मिनिटे गाडी उभी करून प्रवाशांना आपल्याकडे वळवत आहेत. याकडे वाहतूक यंत्रणेने साफ दुर्लक्ष केले असल्याने या परिसरात वाहतूक कोंडी होण्यासोबत पादचाऱ्यांचेही हाल होत आहेत.

वाहतूक पोलीस उपायुक्तांच्या आदेशानुसार व मोटार वाहन कागद्यानुसार एसटी बस स्थानकाच्या २०० मीटर क्षेत्रात अवैध प्रवासी वाहने उभी करण्यास बंदी आहे. मात्र या नियमांना पायदळी तुडवत खासगी बसचालक सिग्नलप्रमाणे ‘नो-पाìकग झोन’मध्ये गाडय़ा उभ्या करीत आहेत. मुंबईतील सर्वात वर्दळीचा परिसर म्हणून दादर टीटीची ओळख आहे. या परिसरात अनेक मोठय़ा बाजारपेठा, कार्यलये, रुग्णालये, चित्रपटगृह, मंदिर, महाविद्यालये आणि ग्रंथालय आहेत. तसेच एसटीचे एशियाड स्थानक आहे. मात्र बसचालकांनी सिग्नलनाच प्रवासी थांबे बनवल्याने येथील वाहतूक कोंडीत भर पडत आहेत. अन्य वाहनचालकांच्या तक्रारीनंतर वाहतूक पोलीस अशा बसवर कारवाई करतात. मात्र, थोडय़ा वेळाने पुन्हा दुसऱ्या बसगाडय़ा येथे उभ्या राहतात. त्यामुळे ही कारवाई केवळ दाखवण्यापुरती असल्याचा दावा केला जात आहे.  दादर टीटी भागात जवळपास प्रत्येक खांबांवर ‘नो-पाìकग झोन’ चे फलक झळकत आहेत. मात्र तरीही ‘जुगाड’द्वारे कायद्याला धाब्यावर बसवत येथे सर्रास पाìकग केली जात आहे.

प्रवाशांनी अशा बस गाडय़ांनी प्रवास करू नये, ही त्यांची जबाबादारी आहे. मात्र एसटी स्थानकाच्या २०० मीटर परिसरात असे प्रकार घडत असतील तर त्यावर कारवाई केली जाईल.

– दिवाकर रावते, राज्य परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष

नो-पाìकग झोन असताना खासगी बसगाडय़ांच्या पाìकगमुळे दादार टीटी भागांतून प्रवास करताना नेहमीच वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. गेली अनेक वर्षे ही परंपरा सुरू आहे. तरीही कारवाई होत नाही, हे आश्चर्यच आहे.

-स्वप्निल गोसावी, प्रवासी

वाहतूक कोंडी मुंबईकरांच्या पाचवीलाच पुजली आहे. मात्र सर्वसामान्यांना दिसणाऱ्या या बेकायदेशीर पाìकगचा प्रश्न यंत्रणेला दिसू नये,ही लाजिरवाणी बाब आहे.

– अमोल लोटणकर, प्रवासी

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Private bus affected on dadar traffic
First published on: 26-05-2016 at 02:31 IST