सर्वपक्षीय सदस्यांचा निर्णयाला विरोध; बेस्ट समितीकडून पुन्हा आढावा

मुंबई : बस प्रवर्तनातील अडचणी लक्षात घेऊन समाधानकारक बस सेवा देण्यासाठी बेस्ट उपक्रमाने १ सप्टेंबरपासून मुंबईतील बसमार्गामध्ये बदल केले. त्यात ४५ मार्ग खंडित व २३ मार्ग बंद के ल्याचा अजब कारभार के ल्याने प्रवाशांची मोठी अडचणही झाली. बसमार्गात बदल करताना प्रवाशांना आगाऊ सूचना न देणे, बेस्ट समिती सदस्यांना विश्वासात न घेणे या मुद्दय़ांवर बेस्ट समितीच्या सोमवारच्या बैठकीत वादळी चर्चा झाली. या बैठकीत सर्वपक्षीय सदस्यांनी उपक्रमाच्या या निर्णयाला कडाडून विरोध के ला. दरम्यान, याबाबत आढावा घेण्यात येत असून प्रवाशांकडून अभिप्रायही घेण्यात येत असल्याचे उपक्रमाकडून स्पष्ट करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईतील ४८४ मार्गावर बस सेवा पुरवली जात होती. मात्र १ सप्टेंबरपासून के लेल्या बदलांमुळे ही संख्या कमी होऊन के वळ ४१९ वर आली. हे बदल करताना प्रवाशांना कु ठलीही आगाऊ सूचना देण्यात आली नाही. यामुळे प्रवाशांना मोठय़ा समस्येला सामोरे जावे लागले. सध्या अत्यावश्यक सेवा कर्मचारी आणि दोन लसमात्रा घेतलेल्या सामान्य प्रवाशांनाच लोकल प्रवासाची मुभा आहे. लसीकरण कमी असल्याने दोन लस मात्रा घेतलेल्यांची संख्या तशी कमीच आहे. त्यामुळे अनेक जण अद्यापही बेस्टनेच प्रवास करीत आहेत. परंतु बस मार्गात के लेल्या बदलांमुळे सामान्य प्रवाशांबरोबरच अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांनाही अडचणींना सामोरे जावे लागत आहे. बससाठी अनेक तास प्रतीक्षा करावी लागणे, बस मार्ग बदलल्याने दुसऱ्या मार्गावर बस पकडण्यासाठी जावे लागणे किं वा रिक्षा, टॅक्सीचा पर्याय निवडणे, तसेच मार्ग खंडित के ल्याने दोन वेळा बस बदलून प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. या निर्णयावर प्रवाशांकडून टीका होऊ लागली आहे.

बेस्ट समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत याच मुद्दय़ावर चर्चा झाली. समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी कोणतेही कामकाज न करता सभा तहकु बीची सूचना मांडली. यावर अखेर प्रशासनाला चर्चा करणे भाग पडले. बेस्ट उपक्र माकडून बदल करताना प्रवाशांना किमान दहा ते पंधरा दिवस आधी आगाऊ सूचना दिली पाहिजे. परंतु तशी सूचना देण्यात आली नाही. अनेक बस थांब्यावर प्रवाशांची गर्दी व गोंधळ झाला. सध्या करोनाच्या साथीमुळे अनेक जण बेस्टवरच अवलंबून आहेत. गर्दी वाढत असतानाच बेस्ट उपक्र माने घेतलेल्या या निर्णयामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत असल्याची टीका त्यांनी के ली. गणेश विसर्जनापर्यंत प्रवाशांची वाढणारी गर्दी, त्यांना येणाऱ्या अडचणी इत्यादीची माहिती उपक्रम घेणार असून त्यानंतर होणाऱ्या बेस्ट समितीच्या बैठकीत या विषयावर पुन्हा चर्चा करण्यात येणार असल्याचे गणाचार्य यांनी सांगितले.

मार्ग बदल हा प्रवाशांच्या सोयीसाठी घेतलेला निर्णय होता. यात बेस्टची वारंवारता कशी वाढेल, यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. परंतु प्रवाशांची गैरसोय होत असेल तर प्रत्यक्षात तसेच समाजमाध्यमांद्वारेही अभिप्राय घेतले जात आहेत. तसेच अधिकाऱ्यांकडूनही आढावा घेतला जात आहे.

-लोकेश चंद्र, महाव्यवस्थापक, बेस्ट उपक्रम

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Problems bus route changes mumbai best ssh
First published on: 07-09-2021 at 01:32 IST