अन्न आणि औषध प्रशासनाचे आदेश 

Kolhapur, bribe, woman food security officer,
लाच स्वीकारताना कोल्हापुरातील अन्नसुरक्षा महिला अधिकारी जाळ्यात
bmc, mumbai municipal corporation, Undertake Rs 209 Crore Drainage Project, Prevent Flooding, Andheri Subway, milan subway, bmc drainage project, mumbai monsoon, mumbai waterlogging, mumbai news,
अंधेरी सब वे पूरमुक्त करण्यासाठी आणखी २०९ कोटी, किमान तीन वर्षे लागणार
धूळ नियंत्रण वाहनांमुळे नागरिकांबरोबरच झाडांचाही मोकळा श्वास
New standards for facilities safety in nurseries
पाळणाघरांतील सुविधा, सुरक्षिततेबाबत नवीन मानके

मुंबई : वृत्तपत्रात अन्नपदार्थ बांधून देण्यास बंदी घालण्यात आली आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) यासंबंधीचे आदेश दिले आहेत. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देशही एफडीएने दिले आहेत.

अन्न सुरक्षा मानके कायद्याअंतर्गत सुरक्षित अन्न आणि अन्नपदार्थ जनतेपर्यंत पोहचावेत यासाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. या कायद्यानुसारच वृत्तपत्रात अन्नपदार्थ बांधून देण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यानुसार आता या नियमाची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश बृहन्मुंबई विभागाने अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाचे  बृहन्मुंबईचे सहआयुक्त शशिकांत केकरे(अन्न) यांनी दिली.  तसे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचेही केकरे यांनी सांगितले.

घातक शाई

वडापाव, भजी, समोसा, भेळ, आणि अन्य काही पदार्थ वृत्तपत्रात बांधून दिले जातात. या पदार्थाना वृत्तपत्राची शाई लागते. ही शाई आरोग्यासाठी घातक आहे. शाई लागलेले अन्नपदार्थाचे सेवन आरोग्यास घातक असल्याचे सिद्ध झाले आहे. या पार्श्वभूमीवर वृत्तपत्रात अन्नपदार्थ बांधून देण्यास बंदी आहे. असे असतानाही मुंबईत वृत्तपत्रात अन्नपदार्थ बांधून दिले जातात.