टीआरपी घोटाळ्याचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेने रिपब्लिक वाहिन्यांची प्रवर्तक कं पनी एआरजी आऊटलायरच्या आर्थिक व्यवहारांचे फॉरेन्सिक ऑडीट केले. त्याचा अंतरिम अहवाल गुन्हे शाखेला प्राप्त झाला. अहवालातून पुढे आलेले संभाव्य आर्थिक गैरव्यवहारांबाबतचे निष्कर्ष गुन्हे शाखेने सक्तवसुली संचलनालय(ईडी) आणि सिरीयस फ्र ॉड इन्व्हेस्टीगेशन ऑफिसकडे (एसएफआयओ)पाठवले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फॉरेन्सिक ऑडीटच्या अंतरिम अहवालानुसार नोव्हेंबर २०१६मध्ये एआरजी आऊटलायरने आपले समभाग मुख्य प्रवर्तक एसएआरजी आणि उपकं पनी एशियानेट न्यूज मिडीया अ‍ॅण्ड एण्टरटेन्मेण्ट प्रायव्हेट लिमिटेडला वितरीत केले. नोव्हेंबर १६ आणि फे ब्रुवारी १७मध्ये एशियानेट या उपकं पनीने एआरजीचे ए आणि बी सीरीजचे मिळून सुमारे ४८ हजार समभाग प्रत्येकी १२ हजार ९९९ रुपयांना विकत घेतले. त्यापोटी सुमारे ६० कोटी रुपये अन्य एका कंपनीच्या खात्यातून एआरजी आऊटलायरच्या खात्यात जमा केले. मात्र नोव्हेंबर १९ आणि गेल्या जानेवारीत मुख्य प्रवर्तक कंपनी एसएआरजीने यातलेच ५६५८ समभाग प्रत्येकी ३६,५४८ रुपयांना विकत घेतले. त्यासाठी एसएआरजी कंपनीने गेल्यावर्षी रेक्लेमेशन रिअ‍ॅलिटी नावाच्या कंपनीकडून १५ कोटी रुपये कर्ज घेतले. एशियानेटने या उपकं पनीने एआरजी आऊटलायर या अन्य उपकंपनीचे प्रत्येकी १३ हजार रुपयांना विकत घेतलेले समभाग मुख्य प्रवर्तक कंपनी एसएआरजीला ३६ हजार रुपयांना म्हणजेच ३०० टक्के चढय़ा भावात विकले. उर्वरित समभाग या दरात विकत घेणाऱ्यांत एआरजी आऊटलायर कंपनीच्या एका संचालकाचाही समावेश असल्याचे या अहवालातून स्पष्ट होते, असा दावा गुन्हे शाखेने केला. या व्यवहारांतील सत्यता पडताळणे आवश्यक आहे, असे गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

गुन्हे शाखेतील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सप्टेंबर २०१९मध्ये एशियानेटने एआरजी आऊटलायरच्या याच संचालकाच्या खात्यात सुमारे सव्वादोन कोटी रुपये जमा केले. पुढल्या आठवडय़ात या संचालकाने ही रक्कम मुख्य प्रवर्तक एसएआरजीच्या खात्यात वळती केली. दोन आठवडय़ांनी ही रक्कम एसएआरजीने एशियानेटच्या खात्यात जमा केली. ही रक्कम समभाग खरेदी-विक्रीच्या निमित्ताने आपापसात फिरवण्यात आली. त्यानंतर एआरजी आऊटलायरच्या संचालकाने अजर्य गर्ग यांच्या खात्यात चार कोटी रुपये जमा केले. हा व्यवहार का घडला, हे अद्याप कळू शकलेले नाही, असे या फॉरेन्सिकच्या अंतरिम अहवालात नमूद करण्यात आले आहे.

गर्ग हे मुख्य प्रवर्तक कंपनी एसएआरजीचे संचालक होते. मात्र गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात त्यांनी वैयक्तिक कारणासाठी एआरजी आऊटलायर आणि एशियानेट कंपन्यांच्या संचालक मंडळाकडे राजीनामा सुपूर्द केला. तो फेब्रुवारीत मंजूर करण्यात आला, हा मुद्दाही गुन्हे शाखेने ईडी, एसएफआयओला कळविल्याचे समजते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Promoters buying and selling of shares in subsidiaries at inflated prices abn
First published on: 19-12-2020 at 00:39 IST