शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षाचे रत्नागिरी जिल्हा संपर्क सुधीर सयाजी मोरे यांनी गुरूवारी ( ३१ ऑगस्ट ) घाटकोपर आणि विद्याविहारदरम्यान रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली होती. याप्रकरणी कुर्ला रेल्वे पोलिसांनी वकील आणि सामाजिक कार्यकर्त्या नीलिमा चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधीर मोरे आत्महत्या प्रकरणी महत्त्वाची माहिती समोर, वकील महिलेनं छळ केल्याचा मुलाचा आरोप नीलिमा चव्हाण यांनी सुधीर मोरे यांचा छळ केल्याचा आरोप मुलाने केला आहे.

३१ ऑगस्टच्या रात्री मोरे यांचा मृतदेह रेल्वे रूळावर आढळला होता. गुरूवारी एक फोन आल्यानंतर वैयक्तिक कामासाठी बाहेर चाललो, असं मोरे खासगी सुरक्षारक्षकाला सांगितलं होतं. तसेच, गाडी न घेता मोरे रिक्षाने बाहेर पडले होते. त्यानंतर घाटकोपर आणि विद्याविहार दरम्यान रेल्वेखाली उडी घेऊन मोरे यांनी आत्महत्या केली होती.

A case has been registered against the girlfriend who killed her boyfriend Nagpur crime news
प्रियकराचा खून करणाऱ्या प्रेयसीवर गुन्हा दाखल; हुडकेश्वर पोलिसांचा प्रकरण दडपण्याचा प्रयत्न?
trees in Mumbai being killed by poison
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
murder of girlfriend, mumbai,
मुंबई : प्रेयसीच्या हत्येप्रकरणी ३० वर्षीय व्यक्तीला अटक
Bombay high court, verdict, Compensation, acid attack victims
अ‍ॅसिड हल्ल्यातील जुन्या पीडितांना नवीन योजनेचा लाभ मिळणार

हेही वाचा : “नितेश राणे आता तोंडात बोळा घालून…”, एकेरी उल्लेख करत ठाकरे गटाच्या नेत्याची बोचरी टीका

अशात सुधीर मोरे यांचा छळ केल्याप्रकरणी मुलाने नीलिमा चव्हाण यांच्यावर कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यानंतर रेल्वे पोलीस नीलिमा चव्हाण यांच्या विक्रोळीतील घरी गेले होते. पण, नीलिमा चव्हाण यांनी घर बदललं असल्याचं समोर आलं.

हेही वाचा : “गृहमंत्री फडणवीसांचा राजीनामा घेतलाच पाहिजे, आमचीही…”; उद्धव ठाकरेंची जालन्यात मागणी

याबाबत ‘मिड डे’शी बोलताना रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं, “आम्ही स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यात मृत्यूपूर्वी मोरे कोणाशी तरी फोनवर बोलत असल्याचं पाहिलं. तसेच, नीलिमा चव्हाण यांनी घरी आम्ही गेलो होतो. मात्र, त्यांनी आपलं घर बदललं आहे. आम्ही अधिकृतरित्या चव्हाण यांना चौकशीसाठी बोलावणार आहोत.”