मुंबई : शाळा, महाविद्यालयांना नाताळची सुट्टी पडली असून नोकरदारांना सलग सुट्ट्या लागून आल्या आहेत. त्यामुळे बहुसंख्य सहकुटुंबांनी बाहेरगावी जाण्याचे बेत आखले आहेत. समुद्रकिनारे, थंड हवेची ठिकाणे, धार्मिक स्थळे, ऐतिहासिक वास्तू येथे नाताळ आणि नववर्ष उत्साहात साजरा करण्याचे बेत अनेकांनी आखले आहेत. त्यामुळे रेल्वे, एसटी १०० टक्के आरक्षित झाल्या आहेत. तर, अनेकानी ऐनवेळी बेत आखल्यामुळे इच्छितस्थळी जाण्यासाठी खासगी बस व इतर पर्यायांचा विचार सुरू आहेत. परिणामी, खासगी वाहनांच्या मागणीत वाढ झाली असून तिकीट दरही गगनाला भिडले आहेत.

हेही वाचा >>> शिवाजी मंदिर नाट्यगृहावर नाट्यनिर्मात्यांचा बहिष्कार; मनमानी कारभार, जाचक नियमांमुळे नाट्यनिर्माते नाराज

bikes become expensive due to high tax says rajiv bajaj
जास्त करामुळे दुचाकी महागल्या! राजीव बजाज यांची टीका; नियामक चौकटीकडेही बोट
Troubled by unruly rickshaw driver at Panvel station Suffering continues despite taking action
बेशिस्त रिक्षाचालकांचा पनवेल स्थानकात अडसर; कारवाई करूनही मुजोरी कायम, प्रवाशांचे हाल
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
heavy traffic jam for two hours in dombivli
डोंबिवली दोन तासांपासून अभूतपूर्व वाहतूक कोंडीत; रविवारी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना फटका

सलग सुट्ट्यांमुळे शनिवारीच मुंबईबाहेर पडणाऱ्यांची संख्या अधिक आहे. गुहागर, दापोली, चिपळूण, गोवा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे येथे जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. एसटी बस आगार, रेल्वेच्या महत्त्वाच्या स्थानकांत प्रचंड गर्दी वाढली आहे. ज्या प्रवाशांना नियमित आणि विशेष रेल्वेगाड्यांची आणि एसटीच्या जादा बसची आरक्षित तिकिटे मिळाली. त्यांचा प्रवास सुरू झाला. मात्र, ज्यांना आरक्षित तिकीटे मिळाली नाहीत, त्यांनी खासगी ट्रॅव्हलला पसंती दिली. मुंबई सेंट्रल, अंधेरी, बोरिवली, भायखळा, दादर, कुर्ला येथून खासगी ट्रॅव्हलच्या गोव्याला जाणाऱ्या जादा बस होत्या. तसेच पुणे, सोलापूर व तिर्थक्षेत्र आदी ठिकाणी जाणाऱ्या बस रांगेत उभ्या होत्या.

एसटीच्या बसमधून दरररोज ५४ लाख प्रवासी प्रवास करतात. तर, २२ ते ३१ डिसेंबरपर्यंत प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. मुंबई – कोल्हापूर या मार्गावरील बस भरून जात आहेत. तसेच समुद्रकिनाऱ्या लगतच्या ठिकाणी बस जास्त प्रमाणात जात आहेत. एसटी बसचे आरक्षण हे विविध ऑनलाइन संकेतस्थळावर होत आहे. त्यामुळे चार दिवसआधीच प्रत्येक तिकीट खिडकीवरून आरक्षण केले जात आहे, अशी माहिती एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

हेही वाचा >>> एक एकरवरील म्हाडा पुनर्विकासात गृहसाठ्याऐवजी अधिमूल्य? अखेर सामान्यांच्या घरांना मुकावे लागणार!

सीएसएमटी – मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेसच्या तृतीय वातानुकूलित डब्याची प्रतीक्षायादी १०० पेक्षा जास्त, तर शयनयान डब्याची प्रतीक्षायादी २०० पेक्षा जास्त आहे. तसेच सीएसएमटी – मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसची द्वितीय श्रेणी डब्याची प्रतीक्षायादी ३०० पेक्षा जास्त आहे. सीएसएमटी – मडगाव वंदे भारत एक्स्प्रेची प्रतिक्षा यादी १०० च्या पुढे आहे.

सण-उत्सव किंवा सलग सुट्टी आल्यास खासगी ट्रॅव्हल्सकडून तिकीटदरात भरमसाठ वाढ केली जाते. मुंबई – गोवा प्रवासासाठी इतर वेळी ८०० ते १००० रुपये तिकीट असते. मात्र नाताळ आणि सलग आलेल्या सुट्ट्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक बाहेर गावी जाण्यास निघाले आहेत. त्यामुळे खासगी बसचे दर २ हजारांपासून ते ४ हजारांपर्यंत वाढले आहेत. मुंबई – गुहागर ९०० ते १,२५० रुपये, मुंबई चिपळूण ९०० ते २,५०० रुपये, मुंबई ते सावंतवाडी २,५०० ते ३,५०० रुपये असे खासगी ट्रॅव्हल्सने दर वाढवले आहेत.