मुंबई : पश्चिम व मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरील प्रवासी संख्येत वाढ झाल्याने लोकलच्या फेऱ्या पूर्ववत कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे या दोन्ही मार्गावरील १३१ लोकल फेऱ्या वाढवण्यासंदर्भात रेल्वे प्रशासन आढावा घेत आहे. यामध्ये मध्य रेल्वेवरील १५ डबा लोकलच्याही फेऱ्यांचा समावेश आहे. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन रेल्वेनेही आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. लोकल फेऱ्या पूर्ववत करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे संकेत रेल्वेकडून देण्यात आले.

अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांबरोबरच दोन लसमात्रा घेतलेल्या सामान्य प्रवाशांना आणि १८ वर्षांखालील मुलांनाही लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली. त्यामुळे गेल्या सोमवारी मध्य व पश्चिम रेल्वेवरील प्रवासी संख्या ६० लाखांपार गेली. परिणामी लोकलमध्ये सकाळी व सायंकाळच्या वेळी मोठय़ा प्रमाणात गर्दी होत आहे.

सध्या या दोन्ही मार्गावर संपूर्ण लोकल फे ऱ्या सुरू नाहीत. पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावर करोनाकाळापूर्वी दररोज १,३६७ लोकल फे ऱ्या होत होत्या. सध्या १,३०४ फे ऱ्या होत आहेत. तर मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावर पूर्वी १,७७२ फे ऱ्या होत होत्या. आता मात्र १,७०४ लोकल फे ऱ्या होत आहेत. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन लोकलच्या फे ऱ्या पूर्ववत कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होऊ लागली आहे.

लोकलच्या फे ऱ्या पूर्ववत करून प्रवाशांना दिलासा द्यावा. तसेच मध्य रेल्वेवरील १५ डब्यांच्या २२ फे ऱ्या बंद असून त्याही सुरू कराव्यात, अशी मागणी उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेचे अध्यक्ष नंदकु मार देशमुख यांनी के ली.

सध्या प्रवाशांना गर्दीतून प्रवास करावा लागत आहे. त्यांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी लोकल फे ऱ्या पूर्ववत कराव्यात, अशी मागणी मध्य व पश्चिम रेल्वेबरोबरच रेल्वे मंत्रालय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती रेल यात्री परिषदेचे अध्यक्ष सुभाष गुप्ता यांनी दिली.

या फेऱ्या सुरू नाहीत

मध्य रेल्वेवरील सीएसएमटी- कल्याण- सीएसएमटी पंधरा डबा लोकलच्या २२ फे ऱ्या होत होत्या. या फे ऱ्यांबरोबरच मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कर्जत या मुख्य मार्गावरील आणि सीएसएमटी ते पनवेल हार्बरवरीलही काही फे ऱ्या सुरू केलेल्या नाहीत.

प्रवासी संख्या वाढत आहे. त्यामुळे लोकल फे ऱ्या पूर्ववत करण्यासंदर्भात आढावा घेण्यात येत आहे. लवकरच याबाबत निर्णय जाहीर करण्यात येईल.

सुमीत ठाकूर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे