रेल्वेमार्गावर एखादा गंभीर अपघात झाल्यास जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात बराच अवधी जातो. हा काळ अत्यंत आणीबाणीचा ठरून त्यात काही जखमी दगावू शकतात. हे टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ कार्यशाळेत आता अपघातात मदतकार्य करणारा एक वैद्यकीय डबा तयार केला आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अरुणेंद्रकुमार यांच्या हस्ते सोमवारी या प्रायोगिक तत्त्वावरील डब्याचे अनावरण करण्यात आले. हा डबा लवकरच वांद्रे टर्मिनस येथील वैद्यकीय गाडीला जोडला जाणार आहे. त्याचबरोबर मालगाडीतील गार्डच्या सौरऊर्जेवर उजळणाऱ्या केबिनचेही अनावरण करण्यात आले.
उपचारासाठी लागणाऱ्या अनेक अत्यावश्यक गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. हा डबा संपूर्ण वातानुकुलित असेल. यात एक ऑपरेशन थिएटर आणि एक सर्जिकल विभाग असेल. या विभागात १२ रुग्णांवर एकाच वेळी उपचार करण्यात येतील. तसेच या डब्यात जखमींना लागणाऱ्या सर्व औषधांचाही साठा अद्ययावत ठेवण्यात येणार आहे. हा डबा वांद्रे टर्मिनस येथे असलेल्या वैद्यकीय गाडीला जोडला जाणार असून रेल्वेमार्गावर मोठा अपघात झाल्यास तातडीने अपघातस्थळी बचावकार्यासाठी रवाना होणार आहे.
पश्चिम रेल्वेच्या अभियंत्यांनी अद्ययावत सौरयंत्रणेचा वापर करून मालगाडीतील गार्डच्या केबिनचे रूपही पालटले आहे.गार्डच्या केबिनमधील विद्युत यंत्रणा सौरऊर्जेवर चालणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 7th Jan 2014 रोजी प्रकाशित
रेल्वेचा अत्याधुनिक वैद्यकीय डबा कार्यान्वित
रेल्वेमार्गावर एखादा गंभीर अपघात झाल्यास जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात बराच अवधी जातो. हा काळ अत्यंत आणीबाणीचा ठरून त्यात काही जखमी दगावू शकतात.
First published on: 07-01-2014 at 03:04 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railways ultra modern medical coach executed