लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींबाबत जे झाले ते वारंवार होत नाही. मोदींची हवा आता विरली आहे. सोशल मीडियांवर लोक त्यांच्याविरोधात लिहू लागले असल्याचे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबईत केले.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी केवळ सोशल मीडियावर आक्रमक न राहता थेट लोकांमध्ये मिसळून त्यांचे प्रश्न समजून घेण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, सध्या सोशल मीडियाचे पेव फुटले आहे. पण केवळ सोशल मीडियावर आक्रमक न राहता कार्यकर्त्यांनी लोकांमध्ये मिसळून त्यांचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत. नरेंद्र मोदींबाबत जे घडले, ते वारंवार होत नाही. आता तर सोशल मीडियावरही मोदींची हवा विरली आहे. लोक तिथेही त्यांच्याविरोधात लिहू लागले आहेत. त्यामुळे सोशल मीडियाच्या आहारी जाऊ नका, असा सल्लाही राज ठाकरे यांनी दिला.
संग्रहित लेख, दिनांक 11th Jul 2014 रोजी प्रकाशित
नरेंद्र मोदींची हवा विरली – राज ठाकरे
लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींबाबत जे झाले ते वारंवार होत नाही.

First published on: 11-07-2014 at 03:18 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray comment on narendra modi