गृहमंत्री अजित पवार यांचा राजीनामा मागण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी जे आंदोलन केले ते अत्यंत घृणास्पद होते. या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. राजकारणात काम करताना काही पथ्ये पाळायची असतात हे कार्यकर्त्यांनी कायम लक्षात ठेवावे. बुधवारी घडलेला अनुचित प्रकार अत्यंत गलिच्छ होता. जी गोष्ट वाईट ती वाईटच. ज्यांनी हा प्रकार केला. त्यांना कडक शासन केले जाईल, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. अशा निंदनीय गोष्टींना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत थारा नाही. याची खूणगाठ प्रत्येक कार्यकर्त्यांने मनाशी बांधावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 12th Apr 2013 रोजी प्रकाशित
घृणास्पद आंदोलन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करणार – राज ठाकरे
गृहमंत्री अजित पवार यांचा राजीनामा मागण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी जे आंदोलन केले ते अत्यंत घृणास्पद होते. या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
First published on: 12-04-2013 at 03:47 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray warn his party workers over obnoxious protest against