उन्हाळ्याच्या सुट्टीत पश्चिम रेल्वे मुंबई सेंट्रल ते हजरत निजामुद्दिन या दरम्यान एक विशेष वातानुकूलित सुपरफास्ट गाडी सोडणार आहे. तर राजधानी एक्स्प्रेस आता जाता-येताना बोरिवली स्थानकावरही थांबणार आहे.
सुपरफास्ट गाडी आठवडय़ातून एकदा दर शुक्रवारी मुंबई सेंट्रलहून मध्यरात्री १२.०५ वाजता सुटेल. ही गाडी त्याच दिवशी हजरत निजामुद्दिन येथे रात्री २३.५० वाजता पोहोचणार आहे. ही गाडी ७ ते २८ मार्च या दरम्यान धावेल.
मुंबई सेंट्रल-नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस ही गाडी आता १५ मार्चपासून प्रवाशांच्या सोयीसाठी बोरिवली स्थानकावरही थांबवण्यात येणार आहे. संध्याकाळी मुंबई सेंट्रल येथून सुटणारी १२९५१ राजधानी गाडी १७.१९ वाजता बोरिवलीला पोहोचेल.
ही गाडी दोन मिनिटे बोरिवलीला थांबणार असून १७.२१ रोजी सुटेल. तर परतीच्या वाटेवरची गाडी बोरिवलीला सकाळी ७.५१ वाजता येईल आणि ७.५३ वाजता रवाना होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st Mar 2014 रोजी प्रकाशित
राजधानी एक्स्प्रेस बोरिवलीला थांबणार
उन्हाळ्याच्या सुट्टीत पश्चिम रेल्वे मुंबई सेंट्रल ते हजरत निजामुद्दिन या दरम्यान एक विशेष वातानुकूलित सुपरफास्ट गाडी सोडणार आहे.
First published on: 01-03-2014 at 12:01 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajdhani express will stop at borivali