स्वत:च्या पंधरा वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या पित्याला विक्रोळी पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. गेल्या वर्षभरात त्याने आठ वेळा आपल्या मुलीवर बलात्कार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
विक्रोळी येथे राहणारा बदीउज्मा सिद्दीकी (४५) हा मौलवी हकीमचे काम करतो. त्याने मौलवीचे धार्मिक प्रशिक्षण घेतले असले तरी तो कुठल्याही मशिदीशी संबंधित नव्हता. रविवारी त्याची पंधरा वर्षांची मुलगी शबनम (नाव बदललेले) आपल्या शेजारी राहणाऱ्या मित्रासह पोलीस ठाण्यात आली आणि वडिलांनीच आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार दिली. विक्रोळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौलवीला एकूण नऊ मुले असून सात मुली आणि दोन मुले आहेत. त्यापैकी दोन मुली विवाहित आहेत. त्याची पत्नी दोन वर्षांंपासून अंथरुणाला खिळलेली आहे. सुरुवातीला या मुलीने आपल्या आईला हा प्रकार सांगितला. मात्र तिने त्याकडे दुर्लक्ष केले. रविवारी शबनम उशीर झाला तरी घरी जाण्यास तयार नव्हती. तिच्या मित्राने याबाबत विचारले असता तिने हा प्रकार सांगितला. त्याच्या मदतीने हिम्मत एकवटून त्यांनी पोलीस ठाणे गाठले. शबनम आठवीत शिकत़े