पोलीस शिपायांच्या ५२९७ पदांची भरती सुरू

२०१८ मधील ६१०० पदभरती प्रक्रिया पूर्ण

२०१८ मधील ६१०० पदभरती प्रक्रिया पूर्ण

मुंबई : पोलीस शिपाई भरतीसाठी २०१८ मध्ये सुरू झालेल्या प्रक्रियेतून सर्व ६१०० पदांची भरती पूर्ण झाली असून आता २०१९ मध्ये जाहीर झालेल्या पोलीस शिपायांच्या ५२९७ पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.

पोलीस शिपायांच्या ६१०० पदांची भरती झाल्यानंतर प्रतीक्षा यादी करण्यात आली. तसेच रुजू न झालेल्या उमेदवारांच्या ४५६ जागेवर प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत. पोलीस शिपायांच्या ५२९७ पदांच्या भरतीसाठी २०१९ मध्ये सुरू झालेल्या भरती प्रक्रियेत एकूण ११ लाख ९७ हजार ४१५ अर्ज आले आहेत. ही भरती प्रक्रिया ऑक्टोबर २०२१ अखेर पूर्ण करण्याचे नियोजित करण्यात आले असून त्यादृष्टीने कार्यवाही प्रगतीपथावर आहे, असे गृहविभागाने म्हटले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Recruitment of 5297 posts of police constables started zws

Next Story
महाबळेश्वर संमेलन अधिकृत, टोरांटो मात्र अनधिकृत!