मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या कार्यकाळात भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले होते. या कथित बँक घोटाळाप्रकरणात मोहित कंबोज यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लीन चीट देण्यात आली आहे. त्यामुळे मोहित कंबोज यांना दिलासा मिळाला आहे. तसेच, शस्त्र कायद्यांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांतूनही त्याची सुटका झाली आहे.

हेही वाचा- पश्चिम आणि मध्य रेल्वेने महिलांच्या सुरक्षेसाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय; कोणता? घ्या जाणून

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोहित कंबोज यांच्या कंपनीने २०११ ते २०१५ या कालावधीत इंडियन ओव्हरसीज बँकेकडून ५२ कोटी रुपये कर्ज घेतले होते. मात्र, कंबोज यांनी कर्जाची इतरत्र वापरल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. कंबोज यांनी ५२ कोटी रुपये कर्ज बुडवले होते. याप्रकरणी कंबोज आणि त्यांच्या कंपनीच्या दोन संचालकांविरोधात माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या कार्यकाळात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर, कंबोज यांनी थेट संजय पांडे यांना आव्हान दिले होते. त्यानंतर एका प्रकरणात पांडे यांना अटकही झाली होती.