आंबेडकरी चळवळीला शाप लागलेल्या रिपब्लिकन पक्षातील गटा-तटाचे राजकारण संपविण्यासाठी रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. त्याची सुरुवात म्हणून १ जानेवारीला भीमा-कोरेगाव येथे ते जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहेत.
डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जमीन मिळविण्यासाठी केलेल्या उग्र आंदोलनामुळे आनंदराज आंबेडकर प्रसिद्धीच्या झोतात आले. भारिप-बहुजन महासंघात सक्रीय असतानाही त्यांनी रिपब्लिकन सेना ही स्वतंत्र संघटना स्थापन केली. आंबेडकरी राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारी बौद्धजन पंचायत समिती रामदास आठवले यांचे वर्चस्व मोडून त्यांनी आपल्या ताब्यात घेतली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत आनंदराज यांनी पाठिंबा द्यावा, यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेते प्रयत्नशील आहेत. परंतु लोकसभा निवडणुका लढवायच्या नाहीत. कुणाला पाठिंबा द्यायचा, की तटस्थ रहायचे, याबाबतचा निर्णय प्रत्यक्ष निवडणुका जाहीर झाल्यानंतरच घेतला जाईल, असे रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ निकाळजे यांनी सांगितले.
वरळी येथे आंबेडकर मैदानावर रविवारी रिपब्लिकन सेनेची जाहीर सभा झाली. त्यावेळी रिपब्लिकन राजकारणातील गटबाज नेत्यांवर आनंदराज यांनी हल्लाबोल केला. लोकसभा निवडणुकीत सारेच गट नामशेष होतील. त्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन सेना पूर्ण ताकदिनीशी उतरेल, अशी घोषणा त्यांनी केली.
दर वर्षी १ जजानेवारीला भीमा-कोरेगावला क्रांतीस्तंभाला अभिवादन करण्यासाठी हजारो आंबेडकरी अनुयायी जमतात. या वेळी आनंदराज आंबेडकर तेथे जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहेत, असे निकाळजे यांनी सांगितले.
रिपब्लिकन पक्षातील गटा-तटाचे राजकारण संपविण्यासाठी रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी केली आहे.दर वर्षी १ जानेवारीला भीमा-कोरेगावला क्रांतीस्तंभाला अभिवादन करण्यासाठी हजारो आंबेडकरी अनुयायी जमतात. त्यावेळी वेळी आनंदराज आंबेडकर तेथे जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहेत,