शिवसेनेला दुसऱ्यांच्या मुलांचे बारसे करण्याची सवय – राणे

शिवसेना आणि भाजप यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांचे वेगळेच फटाके सध्या राज्याच्या राजकारणात फुटताना दिसत आहेत.

BJP Cabinet Minister Narayan Rane Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray Shivsena Vs BJP
( संग्रहित प्रातिनिधिक छायाचित्र)

मुंबई : दादरा नगर हवेलीच्या लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालावरून केंद्रीय मंत्री व भाजप नेते नारायण राणे यांनी शिवसेनेला लक्ष्य केले. तेथील विजयी उमेदवार हा अपक्ष आहे, पण ‘‘शिवसेनेला दुसऱ्यांच्या मुलांचे बारसे करण्याची सवय आहे’’, अशी टीका त्यांनी केली.

शिवसेना आणि भाजप यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांचे वेगळेच फटाके सध्या राज्याच्या राजकारणात फुटताना दिसत आहेत. त्यात आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रपरिषदेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार, प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊतांचा अग्रलेख मी वाचला.  शिवसेनेने डंका सुरू केला की, राज्याच्या बाहेर आम्ही जिंकलो. मुद्दाम मी त्या उमेदवाराची निशाणी मागवून घेतली. ती निशाणी फलंदाज बॅट घेऊन उभा असल्याची आहे. पण दुसऱ्यांच्या मुलाचे बारसे करायची सवय शिवसेनेला आहेच.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Results of lok sabha by election of dadra nagar haveli union minister bjp leader narayan rane target to shiv sena akp

Next Story
पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचा राजीनामा
ताज्या बातम्या