डोंगरउतारावरील झोपडपट्टय़ांचा प्रश्न ऐरणीवर

मुंबई : मुंबईत रविवारी पहाटे पडलेल्या मुसळधार पावसात चेंबूर व विक्रोळी येथे दरड कोसळून ३२ नागरिकांचा बळी गेला आणि पुन्हा एकदा शहरांतील डोंगरउतारांवरील झोपडपट्टय़ांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबईत एकूण २९१ ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका असून त्यापैकी तब्बल २१९ ठिकाणे ही केवळ पूर्व उपनगरांतील आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईतील विविध प्रभागांमध्ये निसरडय़ा डोंगरावर तब्बल २० हजार झोपडय़ांमधून साधारणत: लाखभर नागरिक जीव मुठीत घेऊन राहतात. पावसाळ्यात अनेकदा तेथे दरड कोसळून नागरिकांचा मृत्यू होतो. अशा घटना वारंवार घडतात. या पार्श्वभूमीवर सावधगिरीचा उपाय म्हणून पालिका दरवर्षी अशा डोंगरावर राहणाऱ्या झोपडय़ांना नोटिसा बजावत असते. मात्र तरीही वर्षांनुवर्षे जीव मुठीत घेऊन अनेक नागरिक या झोपडय़ांमधून राहात आहेत. बहुतांशी झोपडय़ा या म्हाडाच्या आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जमिनीवर आहेत. त्यापैकी डोंगर उतारांवरील सर्वाधिक वसाहती पूर्व उपनगरांमधील भांडुप, विक्रोळी, विद्याविहार, घाटकोपर, कुर्ला या परिसरांत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Risk of landslides is higher in the eastern suburbs of mumbai zws
First published on: 23-07-2021 at 00:34 IST