अजित पवारांसह काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. यानंतर खरी राष्ट्रवादी कोणाची हा मुद्दा उपस्थित झाला आहे. यावरून निवडणूक आयोगाने बुधवारी ( २६ जुलै ) शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला नोटीस बजावली आहे. अजित पवार यांच्या गटाने दाखल केलेल्या याचिकेवर ही नोटीस बजावण्यात आली आहे. यावर आमदार रोहित पवार यांनी भाष्य केलं आहे.

विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार म्हणाले, “गेल्या काही वर्षात निवडणूक आयोग सत्तेतील लोकांची बाजू घेते, असं मत सामान्य लोकांचे झाले आहे. निवडणूक आयोगाने नोटीस बजावली असून ती एक प्रक्रिया आहे. ती पूर्ण करत असताना दोन्ही बाजूंचे गट ताकद लावतील आणि युक्तीवादही होईल.”

हेही वाचा : “भविष्यात अजित पवार निश्चित मुख्यमंत्री झाले पाहिजेत, पण…”, शिंदे गटातील नेत्याचं विधान

“पण, निवडणूक आयोग कोणाच्या बाजूने निर्णय देईल, याचा अंदाज सर्वांना आहे. आम्ही न्यायालयात जात लढाई लढू. पण, येत्या काळात लढत असताना चिन्ह राहिलं नाही, तरी लोकांनाच विचारावे शरद पवार यांना कोणतं चिन्ह मिळालं पाहिजे. ते चिन्ह मिळाल्यानंतर लोकांना विश्वासात घेऊन येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जावं लागणार, याचा अंदाज आला आहे,” असं रोहित पवार यांनी म्हटलं.

हेही वाचा : विधीमंडळात गोपीचंद पडळकरांनी कागद फाडले; उपसभापतींना धमकी? नेमकं काय घडलं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“त्यामुळे चिन्हापेक्षा विचार महत्वाचे आहेत. शरद पवारांबरोबर राहून लढतोय हे आमच्यासाठी महत्वाचं आहे,” असेही रोहित पवार यांनी सांगितलं.