रिपब्लिकन पक्षाच्या वतीने येत्या २२ सप्टेंबरला उस्मानाबद येथे दुष्काळग्रस्तांच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषेदत दुष्काळ निवारण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, यावर चर्चा व पक्षाचा कृती कार्यक्रम ठरविला जाणार आहे, अशी माहिती पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी दिली.
राज्यात पावसाने ओढ दिल्यामुळे गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. आठवले स्वत २० व २१ सप्टेंबर असा सांगली, सातारा, सोलापूर, लातूर, बीड या जिल्ह्यांचा दौर करणार आहेत. २२ सप्टेंबरला उस्मानबाद येथे मराठवाडय़ातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर यांची परिषद होणार आहे.