निवडणुकीत किंवा इतर वेळी राजकीय भूमिका घेताना रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांच्या गटबाजीचे दर्शन घडत असते, परंतु राज्यात वाढत्या जातीय अत्याचाराच्या प्रश्नावरही बेकीचे प्रदर्शन होत आहे. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष व इतर काही संघटनांनी एकत्र येऊन २२ जुलैला जातीय अत्याचाराच्या विरोधात मोर्चा काढण्याचे ठरविले आहे. त्यानंतर लगेच खासदार रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली २७ जुलैला याच प्रश्नावर त्यांच्या पक्षाच्या वतीने संघर्ष मोर्चा काढण्याचे जाहीर करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात गेल्या तीन-चार वर्षांत जातीय अत्याचाराच्या सातत्याने घटना घडत आहेत. त्याविरोधात रिपब्लिकन पक्षाचे विविध गट व आंबेडकरी संघटना वेगवेगळी आंदोलने करीत आहेत.