दिवाळी भेट योजनेअंतर्गत पोलिसांना ७५० रुपयांची सवलत

दिवाळी सणासाठी लागणाऱ्या साहित्यामधील ७५० रुपये किमतीचे साहित्यदेखील मोफत मिळणार आहे.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

मुंबई: दिवाळीनिमित्त मुंबई पोलिसांना आवश्यक साहित्यावर ७५० रुपये सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली. 

पोलीस कल्याण निधीतून पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती, प्रोत्साहन, विविध अधिकारी कर्मचारी सत्कार, आरोग्यविषयक सुविधा, व्यायामशाळा, वाचनालय तसेच पोलिसांच्या कल्याणासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून मुंबई पोलीस आयुक्तालय दिवाळी शुभेच्छा, मिठाई आणि भेटवस्तू स्वरूपात दरवर्षी देत होते.  ‘या निर्णयामुळे पोलीस सबसिडीयरी कॅन्टीनमधून खरेदी केलेल्या साहित्यावर तीस टक्के सवलत मिळते आहे. याबरोबरच यावर्षी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या पसंतीचे व आवश्यक असे दिवाळी सणासाठी लागणाऱ्या साहित्यामधील ७५० रुपये किमतीचे साहित्यदेखील मोफत मिळणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rs 750 discount for police under diwali gift scheme akp