सचिन वाझेंनी परमबीर सिंग यांच्यासाठी वसुली केली; पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात दावा

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने शनिवारी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि अन्य तिघांविरुद्ध गोरेगाव उपनगरात दाखल झालेल्या खंडणीप्रकरणी आरोपपत्र दाखल केले.

Former Mumbai Police Commissioner Parambir Singh, Sachin Waze, Parambir Singh and Sachin Waze,

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना ‘नंबर एक’ म्हणत त्यांच्यासाठी वसुली केली, असा दावा मुंबई पोलिसांनी खंडणीच्या एका प्रकरणातील आरोपपत्रात केला आहे. वाझे यांच्या म्हणण्यानुसार वसुलीच्या रकमेपैकी ७५ टक्के रक्कम सिंग यांच्याकडे गेली आणि उर्वरित रक्कम त्यांनी ठेवली. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने शनिवारी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि अन्य तिघांविरुद्ध गोरेगाव उपनगरात दाखल झालेल्या खंडणीप्रकरणी आरोपपत्र दाखल केले. ४०० हून अधिक पानांचे आरोपपत्र मुख्य महानगर दंडाधिकारी एस.बी. भाजीपाले यांच्यासमोर दाखल करण्यात आले.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, परमबीर सिंग यांच्यावर दाखल झालेले हे पहिले आरोपपत्र आहे. राज्यातील खंडणीच्या किमान पाच प्रकरणांमध्ये सिंग यांचे नाव असून या आठवड्याच्या सुरुवातीला त्यांना निलंबित करण्यात आले आहे. आरोपींपैकी सुमित सिंग आणि अल्पेश पटेल जामिनावर बाहेर आहेत तर विनायक सिंग आणि रियाझ भाटी हे वॉन्टेड आरोपी आहेत. सचिन वाझेंनी परमबीर सिंग यांना “नंबर एक” म्हणत पैशांची वसुली केली, अशी पुष्टी तीन ते चार साक्षीदारांनी केली, असं आरोपपत्रात म्हटलंय. तसेच वाझेंना अनेक हायप्रोफाईल प्रकरणांचा तपास करण्यास सांगण्यात आलं होतं. वाझे सिंग यांना थेट भेटून महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करायचे आणि या सगळ्यावरून ते सिंग यांच्या जवळचा असल्याचे दिसून येते, असं आरोपपत्रात नमुद करण्यात आलंय.

आरोपपत्रात म्हटले आहे की, सिंग वाझे व इतर आरोपींमार्फत क्रिकेट बुकी तसेच हॉटेल व बारमालकांकडून पैशांची मागणी करत असे आणि पैसे न दिल्यास त्यांना अटक करण्याची आणि त्यांच्या आस्थापनांवर छापे टाकण्याची धमकी द्यायचा. हे प्रकरण बिमल अग्रवाल यांच्या तक्रारीशी संबंधित आहे. या तक्रारीनुसार, रेस्टॉरंटवर दोनदा छापा न टाकण्यासाठी आरोपीने त्यांच्याकडून ९ लाख रुपये उकळले आणि त्यांच्यासाठी २.९२ लाख रुपये किमतीचे दोन स्मार्टफोन खरेदी करण्यास भाग पाडले. ही घटना जानेवारी २०२० ते मार्च २०२१ दरम्यान घडल्याचे पोलिसांनी यापूर्वी सांगितले होते. यानंतर सहा आरोपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा – परमबीर यांच्याविरोधात पहिले आरोपपत्र ;गोरेगाव खंडणी प्रकरणात वाझेसुद्धा आरोपी

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sachin vaze collected money for parambir singh hrc

ताज्या बातम्या