साकीनाका बलात्कार प्रकरणी आरोपपत्र दाखल

या प्रकरणी ७७ साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.

rape
(प्रातिनिधीक छायाचित्र)

मुंबईतल्या साकीनाका परिसरात झालेल्या संतापजनक बलात्कार प्रकरणात आता आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणातल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणामुळे देशभरातून संताप व्यक्त केला असून पीडितेचा मृत्यू झाला आहे.

“साकीनाका बलात्कार प्रकरणात एकच आरोपी आहे. यात दुसरा आरोपी नाही. सीसीटीव्ही फुटेजमधून दिसत आहे. बलात्कार पीडित मृत महिलेचा जबाब नोंद करता आला नाही. ती बेशुद्ध अवस्थेतच होती. त्यामुळे नक्की काय घडलेलं आहे. याबद्दल आम्ही अनभिज्ञ आहोत. पण तपासातून याबाबत लवकरच अधिक माहिती प्राप्त होईल, अशी माहिती पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली होती. या प्रकरणी आता ७७ साक्षीदारांचे जबाब नोंद करुन ३४६ पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.

हेही वाचा – Mumbai Rape: साकीनाकामधील बलात्कार पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० सप्टेंबरच्या रात्री ३ वाजून २० मिनिटाच्या दरम्यान खैरानी रोड साकीनाका येथे एक पुठ्ठ्याची कंपनी आहे. त्या कंपनीचा वॉचमनने कंट्रोल रुमला फोन करून कळवलं होतं की, इथे एका बाईला मारहाण सुरु आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कंट्रोल रुमने संबंधित पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पोलिसांना कळवलं होतं. संबंधित अधिकारी दहा मिनिटाच्या आत तिथे पोहोचले होते. तिथे त्यांना एका उघड्या टेम्पोत एक महिला अत्यंत गंभीर अवस्थेत आढळली होती. त्यावेळी पोलिसांनी जागेवर निर्णय घेऊन त्या महिलेला इतरत्र कुठे शिफ्ट न करता त्या टेम्पोची चावी वॉचमनकडून घेऊन पोलिसांनी टेम्पो चालवत राजावाडी रुग्णालयात दाखल केलं होतं. डॉक्टरांनी त्या महिलेवर त्वरीत उपचार सुरु केले होते. चौकीदाराच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sakinaka rape case chargesheet against the accused vsk

फोटो गॅलरी