शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने एकच खळबळ उडाली. “सकाळची पत्रकार परिषद बंद करा, अन्यथा गोळ्या घालू,”, अशी धमकी देण्यात आल्याची माहिती संजय राऊतांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी दिली. यानंतर आता स्वतः संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ते शुक्रवारी (९ जून) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “मला धमक्या आजच आलेल्या नाहीत. आतापर्यंत मी देवेंद्र फडणवीसांना धमक्या आल्याबाबत पुराव्यांसह चारवेळा कळवलं आहे. ठाण्यात कोण कुठे माझ्यावर हल्ला करण्याचं कारस्थान करत आहे, गुंडांच्या टोळ्या वापरून माझ्यावर कसा हल्ला करावा याच्या योजना ठाण्यात आखल्या जात आहेत. हे मी पुराव्यांसह कळवलं आहे. मात्र, ठाण्यात त्याच गुंडाला संरक्षण देण्यात आलं.”

INDIA parties project unity at rally in Ranchi
आघाडीत राहिल्यामुळेच सोरेन तुरुंगात; ‘इंडिया’च्या सभेत खरगे यांचा आरोप
Dindori, Mahavikas Aghadi,
दिंडोरीत महाविकास आघाडीतील बंड रोखण्याची धडपड, माकपची जयंत पाटील यांच्याकडून मनधरणी
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
reaction of krupal tumane, MP, eknath shinde, ramtek lok sabha constituency, lok sabha election 2024
उमेदवारी नाकारल्यानंतर शिंदे गटाच्या खासदाराची पहिली प्रतिक्रिया,म्हणाले “हो मी दुःखी, पण….”

“आम्हाला मारण्याचं षडयंत्र रचणाऱ्याला पोलीस संरक्षण”

“या गुंडाला खूनप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. या गुंडाचे फोटो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबर जळकत आहेत. मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदेंबरोबरही या गुंडांचे फोटो ठाण्यात लागले आहेत. आम्हाला मारण्याचं षडयंत्र रचणाऱ्याला पोलीस संरक्षण देण्यात आलं. ही या राज्यातील कायदा-सुव्यवस्था आहे,” असा आरोप संजय राऊत यांनी केला.

हेही वाचा : मुंबई विवस्त्र मृतदेहप्रकरणी अजित पवारांची मोठी विधानं, म्हणाले, “आरोपीला वसतिगृहातील अनेक मुली फोन करायच्या, कदाचित…”

“मिंधे गटाला सुरक्षा द्यायलाच पोलीस पुरत नाहीत”

“मधल्या काळात पुण्यातून धमक्यांचं सत्र सुरू झालं होतं. तेव्हा पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली. आता हे नवीन प्रकरण सुरू झालं आहे. तुम्हाला कळवणं हे आमचं कर्तव्य आहे. आम्ही सरकारकडे पोलीस संरक्षण मागत नाही. हे पोलीस मिंधे गटाला सुरक्षा द्यायलाच पुरत नाहीत. ते आम्हाला सुरक्षा कसे देणार,” असं म्हणत राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला.