scorecardresearch

Premium

“हा एवढा माज कोठून आला? याचं…”, मुलुंडमध्ये महिलेला घर नाकारल्यानंतर राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

तृप्ती देवरूखकर यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत.

sanjay raut eknath shinde (1)
संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

मुंबईतील अनेक भागांत मराठी माणसावर अन्याय झाल्याच्या घटना याआधीही समोर आल्या आहेत. असाच आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा धक्कादायक प्रकार मुंबईतील मुलुंडमधून समोर आला आहे. या व्हिडीओत एक मराठी महिला संतप्त झाल्याचं पाहायला मिळत आहे.

नेमकं प्रकरण काय?

तृप्ती देवरूखकर नावाच्या एका महिलेनं मुलुंड पश्चिमेला ‘शिवसदन’ नावाचा इमारतीत घरासाठी जागा पाहिली होती. ‘महाराष्ट्रीयन लोकांना जागा देत नाही,’ असं सोसायटीमार्फत या महिलेला सांगण्यात आलं. सोसायटीकडून हुसकावरून लावण्याचा प्रयत्न झाला असल्याचं तृप्ती देवरूखकर व्हिडीओत सांगतात.

Jayant Patil on Ajit Pawar comparision to Modi- Shah
‘तुलना कुणाशी करायची, याचं भान…’, अजित पवारांच्या ‘त्या’ दाव्यानंतर जयंत पाटील यांचा टोला
ashok chavan statement on adarsh scam after joining bjp zws
आदर्श हा राजकीय अपघात! भाजपमध्ये प्रवेशानंतर अशोक चव्हाण यांचे वक्तव्य
shiromani akali dal
शिरोमणी अकाली दल अन् भाजपामध्ये युतीची चर्चा; जेडीयूनंतर आणखी एक जुना मित्रपक्ष एनडीएत परतणार?
uddhav thackeray shiv sena protest against zilla parishad officers for dancing on zingaat song
सांगली: जिल्हा परिषद अधिकाऱ्यांचे झिंगाट नृत्यावर शिवसेनेचा आक्षेप, कारवाई करण्याची मागणी

हेही वाचा : “महाराष्ट्रीयन अलाऊड नाही” म्हणणाऱ्या बाप-लेकानं मराठी महिलेची मागितली माफी; नेमकं घडलं काय होतं? पाहा Video!

‘तुम्ही जे सांगत आहात ते लेखी द्या’, असं तृप्ती देवरूखकर यांनी मागितलं. पण, नंतर तृप्ती देवरूखकर यांच्याबरोबर सोसायटीच्या सचिवांनी अरेरावाची भाषा सुरू केली. तसेच, हुज्जतही घातली आहे. नवऱ्याला मारहाण केल्याचा आरोप तृप्ती देवरूखकर यांनी व्हिडीओत केला आहे.

घडलेला प्रकार तृप्ती देवरूखकर यांनी सोशल मीडियावर शेअर करत संताप व्यक्त केला. याची दखल घेत मनसेनं थेट शिवसदन सोसायटी गाठली. सोसायटीकडून बोललेल्या व्यक्तीला मनसेनं जाब विचारत खडसावलं. काही वेळ चर्चा झाल्यानंतर सोसायटीमार्फत बोललेल्या व्यक्तीनं माफी मागितली.

हेही वाचा : पंकजा मुंडे यांची चहूबाजूने कोंडी, कारखान्यावर कारवाई; पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी डावलल्याने खदखद

“हा माज कोठून आला”

यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी भाजपासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. ‘एक्स’ ( ट्वीटर ) अकाउंटवर संजय राऊत म्हणाले, “हा एवढा माज कोठून आला? मुलुंडमध्ये मराठी माणसाला जागा नाकारण्यापुरता हा विषय नाही. आणखी बरेच काही आहे. हा माज कोठून आला. याचे उत्तर एकनाथ शिंदे वत्यांच्या मिंधे महामंडळाने द्यायला हवे.”

“तृप्ती देवरुखकर यांचे अश्रू वाया जाणार नाहीत”

“भाजपाने शिवसेना फोडली ती या मंडळींचा माज वाढवण्यासाठी. मराठी माणूस मिंधा करण्याचा हा डाव उधळला जाईल. जे म्हणतात आमचीच शिवसेना खरी ते उघडे पडले. तृप्ती देवरूखकर यांचे अश्रू वाया जाणार नाहीत. जय महाराष्ट्र!”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sanjay raut on eknath shinde after women trupti devrukhkar not allowed home mulund shivsadan society ssa

First published on: 28-09-2023 at 12:33 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×