scorecardresearch

“संजय राऊत हा राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलेला…”, ‘या’ प्राण्याशी तुलना करत संतोष बांगरांची संतप्त प्रतिक्रिया!

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

sanjay-raut-and-santosh-bangar
फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. बांगर यांनी राऊतांवर टीका करताना त्यांची थेट प्राण्याशी तुलना केली आहे. तसेच संजय राऊत हे महागद्दार आहेत, अशी टीकाही संतोष बांगर यांनी केली.

खरं तर, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ‘आनंदाचा शिधा’ योजनेवरून शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली होती. “आनंदाचा शिधा अद्याप लोकांपर्यंत पोहोचला नाही. तो शिधा खोक्यातून सर्व ४० आमदारांना मिळाला आहे,” अशी टीका संजय राऊतांनी केली. राऊतांच्या या टीकेबद्दल विचारलं असता संतोष बांगर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. त्यांनी संजय राऊतांशी तुलना थेट कुत्र्याशी केली.

हेही वाचा- “…तर आपल्या बाब्याला कार्टं व्हायला वेळ लागणार नाही”, बीडमध्ये पंकजा मुंडेंचं सूचक विधान!

संजय राऊतांच्या टीकेबद्दल विचारलं असता संतोष बांगर म्हणाले, “संजय राऊत हे खोक्यांवरून जी टीका करतात, त्याचा आता कंटाळा आला आहे. संजय राऊत ज्या आमदारांना खोके-खोके म्हणत आहेत, त्याच आमदारांच्या जीवावर हा खासदार झालाय. म्हणून मला वाटतं की, संजय राऊत यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडणुकीला सामोरं जावं. संजय राऊत हा महागद्दार आहे. त्याने शिवसेना संपवून टाकली. संजय राऊत हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधलेला कुत्रा आहे.”

हेही वाचा- “आता बोलायची वेळ आलीय, कारण…”; बीडमध्ये पंकजा मुंडेंचं थेट विधान, नेमका रोख कुणाकडे?

संजय राऊतांना उद्देशून संतोष बांगर पुढे म्हणाले, “आम्हाला खाजवण्याचा प्रयत्न करू नका. संजय राऊतांना पुन्हा सांगायचं आहे की, तुम्ही शिवसेना संपवली आहे. शिवसेनेला तुम्ही कुठे नेऊन ठेवलं आहे, हे महाराष्ट्राची जनता बघत आहे.”

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-03-2023 at 15:46 IST

संबंधित बातम्या