प्रवासादरम्यान अपंग प्रवाशांना मदत करण्यासाठी आणि त्यांचा प्रवास सुखकर करण्यासाठी कोकण रेल्वेने आता ‘सारथी’ ही सेवा सुरू केली आहे. या सेवेअंतर्गत अपंग प्रवाशांसाठी व्हील चेअरसह एक सहाय्यक उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सध्या ही सेवा चिपळूण, रत्नागिरी, करमाळी, मडगाव आणि उडुपी या स्थानकांवरच उपलब्ध आहे. या विनामूल्य सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना त्यांचे नाव आणि आरक्षणाचा तपशील ९६६४०४४४५६ या क्रमांकावर एसएमएस द्वारे पाठवायचा आहे. हा संदेश पाठवल्यानंतर कोकण रेल्वेचे हे ‘सारथी’ व्हील चेअरसह प्लॅटफॉर्मच्या दरवाज्याशी अथवा तुमच्या डब्याशी येऊन थांबलेले असतील.