लोणावळ्याजवळ एसटी बस ५० फूट खोल दरीत कोसळली

मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर शुक्रवारी संध्याकाळी लोणावळ्यानजीक एसटीची बस दरीत कोसळून अपघात झाला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याचेही समजत आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर शुक्रवारी संध्याकाळी लोणावळ्यानजीक एसटीची बस दरीत कोसळून अपघात झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू आणि २० जण जखमी झाल्याचेही समजत आहे. लोणावळ्यातील पांगोळी गावानजीक साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने येण्यास निघालेली ही एसटी ५० फूट खोल दरीत कोसळली. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी बचावकार्याला सुरूवात झाली असून, एसटी दरीतून बाहेर काढण्यासाठी अपघातस्थळी चार क्रेन्स आणण्यात आल्या आहेत. अपघातातील जखमींवर उपचार करण्यासाठी या ठिकाणी ५ रुग्णवाहिकाही दाखल झाल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Satara mumbai st bus accident near lonavala on mumbai pune express highway

Next Story
पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचा राजीनामा
ताज्या बातम्या