मुंबई : पालिका निवडणूका जवळ आल्यामुळे राजकीय वातावरण तापू लागले असून निवडणुकीच्या तोंडावर आता प्रभागांच्या पुनर्रचनेची मागणी होऊ लागली आहे. शिवसेनेने मुंबईतील ३० प्रभागांच्या पुनर्रचनेची मागणी के ली आहे. तर कॉंग्रेसनेही मुंबईतील ४५ प्रभागांच्या रचनेत सुधारणा करण्याची मागणी के ली आहे. यापूर्वी २०१७ च्या निवडणूकांमध्ये भाजपने आपल्या फायद्यासाठी या प्रभागांची मोडतोड के ल्याचा आरोप या दोन्ही पक्षांनी के ला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फे ब्रुवारी २०२२ मध्ये पालिके च्या निवडणूका होणे अपेक्षित आहे. करोनामुळे राज्यातील काही महानगर पालिकांच्या निवडणूका वर्षभरापासून लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीबाबतही अनिश्चिततेचे वातावरण होते. मात्र आता राज्य निवडणुक आयोगाने निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश पालिका प्रशासनाला नुकतेच दिले आहेत. तसेच प्रभागांच्या पुनर्रचनेसाठीही तयारी दर्शवली आहे. त्यामुळे आता निवडणुका पुढे ढकलणार का या विषयाला पूर्णविराम मिळालेला असला तरी आता प्रभागांच्या पुनर्रचनेवरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

पालिका निवडणूकांच्या तोंडावर तत्कालीन राज्य सरकाने सन २०१७ मध्ये मुंबई महापालिके च्या २२७ प्रभागांची पुनर्रचना करताना आपल्या पदाचा गैरवापर करून भाजपसाठी निवडणुका सोयीच्या होतील अशा पद्धतीने प्रभागांची पुनर्रचना के ली असा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी राज्य निवडणूक आयुक्त यु. पी. एस. मदान यांना लिहिलेल्या पत्रात के ला आहे. या पुनर्रचनेमुळे कॉंग्रेसला ४० ते ५० जागा त्यावेळी अधिक मिळाल्या, असा आरोपही राजा यांनी के ला आहे. त्यामुळे काही विशिष्ट ४५ प्रभागांच्या भौगोलिक रचनेत सुधारणा करण्याची विनंतीही त्यांनी के ली आहे.

शिवसेनेनेही ३० प्रभागांची पुनर्रचना करण्याची मागणी के ली आहे. त्यावरून सेना आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मात्र २०१७ मध्ये प्रभाग रचना बदलण्यात आली त्यावेळी सत्तेत के वळ भाजप नव्हता तर शिवसेनाही आमच्याबरोबर सत्तेत होती, असा मुद्दा भाजपचे सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी मांडला आहे.

मोडतोड कशी

२०१७ च्या निवडणुकीत झालेल्या प्रभाग रचनेत शहर विभागातील सात प्रभाग कमी झाले होते. त्याचबरोबर चेंबूर,घाटकोपर,भांडूप, विक्रोळी वांद्रे पुर्व या भागातील प्रत्येक १ प्रभाग घटला होता. दुसऱ्या बाजूला उत्तर मुंबईतील गोरेगाव, दहिसर येथील प्रत्येकी १ आणि मालाड कांदिवली येथील प्रत्येकी दोन प्रभाग वाढले होते. शीव परिसरात १६७ क्रमांकाच्या प्रभागाचे दोन प्रभाग के ले. त्यातील एक भाग शीव कोळीवाडय़ात समाविष्ट के ला तर १७७ क्रमांकाचा आणखी प्रभाग स्थापन करण्यात आला.

जुनी प्रभागरचना लगू करावी

२०१७ मध्ये झालेल्या प्रभाग रचनेचा अभ्यास करण्यासाठी काँग्रेसने सत्यशोधन समिती स्थापन के ली होती. शहर आणि उपनगरात भाजपने गुजराती भाषिक प्राबल्य असलेल्या प्रभागांची निर्मिती के ल्याचा आरोप या समितीने आपल्या अहवालात के ली होती. त्यामुळे २०२२ पूर्वी या प्रभागांची पुनर्रचना करण्याची गरजही या अहवालात नमूद करण्यात आली होती. शहर भागातील अशा ११ प्रभागांची संख्या कमी करून उपनगरातील संख्या वाढवण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला होता.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sena congress ward restructuring demand ssh
First published on: 03-06-2021 at 01:31 IST