वाडा येथील सोनारपाडा परिसरात बुधवारी रात्री चोरटय़ांनी झोपेत असलेल्या एका शिक्षकाच्या कुटुंबीयांवर गुंगीचा फवारा मारुन घरातून सुमारे सात लाखांचा ऐवज लुटून नेला. गेल्या वीस वर्षांच्या सेवेत या शिक्षकाने जमविलेली सर्वपुंजी चोरटय़ांनी लंपास केल्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे.
वाडा येथील सोनारपाडा परिसरात रहाणारे लक्ष्मण गावीत हे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. बुधवारी रात्री गावीत यांचे कुटूंबिय घरात झोपलेले होते. मध्यरात्री चोरटय़ांनी घराच्या खिडकीतून गुंगीचे औषध फवारून सर्वाना बेशुद्ध केले. त्यानंतर घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि कपाटातून २० तोळे सोन्याचे दागिने, ५० हजार रोख रक्कम, तीन मोबाईल, लॅपटॉप आणि कॅमेरा, असा सुमारे सात लाखांचा ऐवज लुटून नेला. सकाळी गावित कुटुंबीयांना जाग आली, त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला.
संग्रहित लेख, दिनांक 18th Oct 2013 रोजी प्रकाशित
वाडय़ात सात लाखांची घरफोडी
वाडा येथील सोनारपाडा परिसरात बुधवारी रात्री चोरटय़ांनी झोपेत असलेल्या एका शिक्षकाच्या कुटुंबीयांवर
First published on: 18-10-2013 at 03:41 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seven lakh robbery in wada