सीबीआयने एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर वानखेडेंवर अटकेची टांगती तलवार आहे. या पार्श्वभूमीवर समीर वानखेडे यांनी सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द व्हावा आणि अंतरिम संरक्षण मिळावं म्हणून मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेत अनेक गौप्यस्फोट करण्यात आले आहेत. यात शाहरूख खान आणि समीर वानखेडे यांच्या झालेल्या व्हॉट्सअॅप चॅटचाही समावेश आहे.

आर्यन खानला अटक झाल्यानंतर शाहरूख खानने समीर वानखेडेंना केलेल्या टेक्स्ट आणि व्हॉट्सअॅप मेसेजचे स्क्रिनशॉट याचिकेबरोबर जोडण्यात आले आहेत. यानुसार शाहरूखने आर्यनच्या सुटकेसाठी समीर वानखेडेंकडे आर्यन खानला सोडण्यासाठी भीक मागतो, असं म्हटलं होतं.

ISIS, five ISIS terrorists, Special court Delhi,
पुण्यातील तरुणीसह आयसिसच्या पाच दहशतवाद्यांना सक्तमजुरी, दिल्लीतील विशेष न्यायालयाकडून शिक्षा
Arvind kejriwal
“विद्यार्थ्यांच्या हितापेक्षा राजकीय स्वार्थाला प्राधान्य”; दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवालांना फटकारले
ayesha jhulka, High Court, Pet Dogs Killing, Ayesha Jhulka Moves High Court, Seeking Expedited Justice, ayesha jhulka pet dog killed, ayesha jhulka dog killed case, mumbai high court, mumbai news,
हत्या झालेल्या श्वानाला न्याय मिळवून देण्यासाठी अभिनेत्री आयेशा जुल्का उच्च न्यायालयात
supreme court on private hospitals bed
राखीव खाटांच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाकडून खासगी रुग्णालयांची कानउघडणी; म्हणाले, “ही रुग्णालये सरकारी अनुदान घेतात पण…”

शाहरूख-वानखेडेंमधील चॅटमध्ये नेमकं काय?

शाहरूख खान समीर वानखेडेंना म्हणाला, “कृपया मला कॉल कर. मी आर्यन खानचा वडील म्हणून तुझ्याशी बोलेन. तू चांगला माणूस आहे, एक चांगला पतीदेखील आहेस आणि मीदेखील.”

“मी तुझ्याकडे भीक मागतो, माझ्या मुलाला…”

“कायद्यात राहून माझ्या कुटुंबासाठी मी तुझ्याकडे मदत मागत आहे. मी तुझ्याकडे भीक मागतो. माझ्या मुलाला तुरुंगात जाऊ देऊ नको. तुरुंगात गेल्यामुळे माणूस खचून जातो. तू मला वचन दिलं आहेस की, माझ्या मुलाला बदलून टाकशील. माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर दया कर. माझ्या मुलाला घरी पाठव. मी तुझ्याकडे एक वडील म्हणून भीक मागतो,” असं शाहरूखने म्हटलं.

हेही वाचा : सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात उच्च न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा, समीर वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“शाहरूख मी तुला चांगला माणूस म्हणून ओळखतो”

यावर चॅटमध्ये समीर वानखेडे म्हणतात, “शाहरूख खान मी तुला चांगला माणूस म्हणून ओळखतो. जे होईल ते चांगलं होईल. तू तुझी काळजी घे.”