ज्यांना शिवसैनिकांनी मोठे केले ते बुडत्या बोटीत जात आहेत. पण निष्ठावान शिवसैनिक मात्र आहे त्याच जागी आहे. हे निष्ठावान सैनिक माझे भांडवल आहे. त्यामुळे अडगळीत पडलेली माणसे निघून गेली तरी निष्ठावान शिवसैनिक हीच माझी ताकद आहे. ती येत्या निवडणुकीत मी दाखवून देईन, अशी गर्जना करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापुढे शिवसेनेत लोकशाही बंद करण्यात येत असून, मी जो निर्णय घेईन तोच अंतिम असेल, असे जाहीर केले. राष्ट्रवादी हा गद्दारांचा पक्ष असून या गद्दारांचे नेतृत्व सोनिया गांधी यांच्या पाठीत खंजीर खुपसणारे शरद पवार करीत आहेत, अशी टीकाही त्यांनी या वेळी केली.
शिवसेना, भाजप, रिपाइं, रासप, स्वाभिमानी शक्ती संघटना या महायुतीची जिल्ह्यातील पहिली सभा डोंबिवलीत आयोजित करण्यात आली होती. शिवबंधन गंडा बांधल्यानंतर अनेकांनी तो ढिला होत असल्याची टीका केली. पण आजच्या महासभेतील गर्दीने हा धागा किती घट्ट आहे हे दाखवून दिले आहे. शरद पवार आता महायुतीमधील अडगळीत पडलेली माणसे चढय़ा भावाने विकत घेत आहेत. पवार गद्दार, त्यांचे शिष्य भुजबळ गद्दार आणि ठाणे, कल्याणमधून खासदारकी मिरवणारे दोघेही गद्दार, अशा शब्दांत उद्धव यांनी राष्ट्रवादीचा उल्लेख या वेळी गद्दारांचा पक्ष असा केला.
डोंबिवलीत प्रदूषणामुळे हिरवा पाऊस पडतो. हे हिरवे डबके रोखले नाही तर त्याचा उद्या महापूर येईल. असा हिरवा पाऊस आम्ही कदापि पडू देणार नाही, असे ठाकरे म्हणाले.  अभिनेता संजय दत्तला एक न्याय आणि कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा सिंग, असीमानंद यांच्यावर कोणते गुन्हे दाखल नाहीत तरी त्यांना अमानुषपणे का छळले जात आहे, असा सवाल त्यांनी केला. असीमानंदांच्या मुलाखतीचा धागा पकडून सरसंघचालक मोहन भागवत यांना अडकवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.  आनंद परांजपे हे नगरसेवक होण्याच्या लायकीचे नव्हते, पण शिवसेनाप्रमुखांनी त्यांना खासदार बनवले. या गद्दाराला आता एक साधा शिवसैनिक धूळ चारील असा इशारा भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी दिला. सिंचनानंतर आता वीजचोरीची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी येणाऱ्या अधिवेशनात करा. भ्रष्टाचाराच्या फायली जाळण्यासाठी मंत्रालय जाळले, त्यांना तुरुंगात टाकण्याचे काम आमचे सरकार करील असा विश्वास मुंडे यांनी व्यक्त केला. रामदास आठवले यांनी शेरोशायरी पद्धतीने भाषण करून  हास्याची लकेर उठवली. ठाणे जिल्हा विभाजनाचा भिजत ठेवलेला प्रश्न, राज्य सरकारची निष्क्रियता या विषयावर टीका केली.
नातू भाजपमध्ये
गुहागरचे माजी आमदार विनय नातू यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी, मनसेच्या कार्यकर्त्यांनी या वेळी शिवसेना, भाजपमध्ये प्रवेश केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी या वेळी अनुपस्थित होते.
सभेमुळे कल्याण, शीळ फाटा मार्गावर सायंकाळपासून वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. ठाणे जिल्ह्य़ात महायुतीचा हा पहिलाच मेळावा असल्याने त्यानिमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी युतीच्या स्थानिक नेत्यांनी केली होती. ठाणे जिल्ह्य़ातील वेगवेगळ्या भागांमधून कार्यकर्त्यांचे जथेच्या जथे डोंबिवलीच्या दिशेने सायंकाळपासून पोहोचत होते. या गर्दीचे नियोजन करण्यात वाहतूक पोलिसांना अपयश आल्याने शीळ, कल्याण मार्गावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत होते. वाहनांची गर्दी शीळ, महापे मार्गावर होती.
सेनेत लोकशाही नाहीच
ज्यांना शिवसैनिकांनी मोठे केले ते बुडत्या बोटीत जात आहेत. पण निष्ठावान शिवसैनिक मात्र आहे त्याच जागी आहे. हे निष्ठावान सैनिक माझी ताकद आहे. ती येत्या निवडणुकीत मी दाखवून देईन, अशी गर्जना करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापुढे शिवसेनेत लोकशाही बंद करण्यात येत असून, मी जो निर्णय घेईन तोच अंतिम असेल, असे जाहीर केले.
शिवसेना, भाजप, रिपाइं, रासप, स्वाभिमानी शक्ती संघटना या महायुतीची जिल्ह्यातील पहिली महासभा डोंबिवलीत आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. गद्दार आनंद परांजपे हे नगरसेवक होण्याच्या लायकीचे नव्हते, पण शिवसेनाप्रमुखांनी त्यांना खासदार बनवले. या गद्दाराला आता एक साधा शिवसैनिक धूळ चारील असा इशारा भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी दिला. रामदास आठवले यांनी शेरोशायरी पद्धतीने भाषण करून उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उठवली.
डोंबिवलीत रविवारी महायुतीने सभेद्वारे शक्तीप्रदर्शन केले (छाया: दीपक जोशी)