टिनपाट पुढारी असो, राष्ट्रीय नेता असो की उद्योगपती, कायदा मोडणे हे आपल्या इथे पुरुषार्थाचे लक्षण मानले जाते. स्वत: शिवाय प्रत्येकाचे स्वातंत्र्य जपण्याची जबाबदारीही आपल्यावरच येते, याचे भान सुटू लागले की कायदेभंगात शौर्य मानणाऱ्या शक्ती डोके वर काढू लागतात. यातूनच बलात्कार, अत्याचार करणाऱ्यांनाही ताकद मिळू लागते. कोपर्डी बलात्कारानंतरही असेच चित्र पाहायला मिळत असून अशा घटनानंतरच्या सामाजिक परिस्थितीवर ‘सडके पौरुष’ या अग्रलेखात भाष्य करण्यात आले आहे. याच अग्रलेखावर विद्यार्थ्यांना या आठवडय़ात ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये आपले विचार मांडायचे आहेत.  काही अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी loksatta.blogbenchers@expressindia.com या ई-मेलवर संपर्क साधावा.