कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याच्या नावाने ‘व्हॉट्स अॅप’वरुन पन्नास लाख रुपयांच्या खंडणीचा संदेश पाठविणाऱ्या शेखू उर्फ शेरू मोहंमद अहमद शेख या २६ वर्षांच्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक विनायक वस्त आणि त्यांच्या विनायक मेर, सचिन कदम, संजीव धुमाळ या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. दक्षिण मुंबईतील एका धातू व्यापाऱ्याला ११ जुलै रोज व्हॉट्स अॅपवर पन्नास लाख रुपये खंडणी देण्याचा संदेश आला. घाबरलेल्या व्यापाऱ्याने मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाकडे मदत मागितली होती.
संग्रहित लेख, दिनांक 26th Jul 2015 रोजी प्रकाशित
खंडणीची मागणी करणाऱ्याला अटक
मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक विनायक वस्त आणि त्यांच्या विनायक मेर, सचिन कदम, संजीव धुमाळ या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.

First published on: 26-07-2015 at 08:58 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sheru arrest in extrortion money