एमआयएमने बिहार निवडणूकीत उडी घेतली असतानाच शिवसेनेनेसुद्धा आपली पाठ ताठ केली आहे. बिहार निवडणूकीत शिवसेनाही उतरणार असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे शिवसेना ही निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचे कळते.
महाराष्ट्रानंतर बिहार विधानसभा निवडणूकीच्या आखाडयात एमआयएम उतरणार असल्याची घोषणा एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी शनिवारी केली. त्यानंतर आज शिवसेनेनंही या निवडणूकीत  उतरण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना बिहार निवडणूक लढवणार असली तरी आम्ही भाजपसोबत ही निवडणूक लढवणार नाही असे संजय राऊत यांनी म्हटले. एनडीएत आधीपासून भाजपसोबत मोठमोठी माणसे आहेत त्यामुळे भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही,  असा टोलाही त्यांनी लगावला. मात्र, तेथून शिवसेनेचे किती उमेदवार उभे करायचे याबाबतचा निर्णय अद्याप झाला नसून, तो निर्णय पक्षप्रमुख लवकरचं घेतील असेही त्यांनी सांगितले.