मुंबई: ठाण्यातील शिवसेनेचे नवनियुक्त जिल्हाप्रमुख केदार दिघे यांना मुंबई पोलिसांनी समन्स पाठवून चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले आहे. बलात्कार पीडितेला धमकावल्याप्रकरणी  दिघे यांच्याविरोधात एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केदार यांचे मित्र रोहित कपूर यांच्याविरोधात २३ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. कपूरने लोअर परळ येथील पंचतारांकीत हॉटेलमध्ये तरूणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी दिघे यांनी पीडित तरुणीला पोलिसांत तक्रार करू नये म्हणून धमकावल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी कपूर हा दिघे यांचा परिचीत असून त्याने २८ जुलैला लोअर परळ येथील पंचतारांकीत हॉटेलमध्ये तरूणीवर बलात्कार केला.  पीडित मुलगी याप्रकरणी पोलिसांत तक्रार करणार असे समजल्यानंतर केदार दिघे यांनी पीडित तरूणीला धमकावल्याचा आरोप आहे. याप्रकरणी ना.म. जोशी मार्ग पोलिसांनी भादंवि कलम ३७६(बलात्कार) व ५०६(२)(धमकावणे) आदी कलमांतर्गत दोघांवर गुन्हा दाखल केला होता.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena thane district chief kedar dighe summoned police inquiry ysh
First published on: 06-08-2022 at 00:59 IST