पायाभूत सुविधा प्रकल्पांची गती वाढवा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई : दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई यांना जोडणाऱ्या १८ हजार रुपये खर्चाच्या महत्त्वाकांक्षी अशा शिवडी- न्हावाशेवा पारबंदर प्रकल्पाचे (एमटीएचएल) ३५-४० टक्के काम पूर्ण झाले असून सप्टेंबर २०२३ मध्ये हा प्रकल्प पूर्ण होईल अशी ग्वाही मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली.

मुंबई शहरासह महानगर परिसराच्या दळणवळणासाठी महत्वपूर्ण असलेले पायाभूत सुविधा प्रकल्प कालमर्यादेत पूर्ण करून नागरिकांना सुलभ आणि गतिमान परिवहन सेवा उपलब्ध करून द्यावी असे आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

mumbai, Sea Coast Road,
मुंबई : सागरी किनारा मार्ग आणि वांद्रे – वरळी सागरी सेतू जोडणीच्या कामाला वेग, अखेर तुळई वरळीत दाखल
Shiv Panvel Highway, Accident, Accident on Shiv Panvel Highway, Ola App Passengers, Raises Safety Concerns, ola drivers, ola cab, marathi news, panvel news, panvel, accident news,
शीव-पनवेल महामार्गावरील रात्रीच्यावेळी प्रवास सुरक्षित आहे का ?
two ac local trains canceled due to technical glitches on central railway
मध्य रेल्वेवरील वातानुकूलित लोकलचा खोळंबा; दोन वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांच्या पासचे पैसे वाया
रेल्वे सुसाट…! गेल्या वर्षभरात साडेपाच कोटी प्रवासी अन् फुकट्या प्रवाशांना २७ कोटींचा दंड

पुढील वर्षी होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वाभूमीवर शिवसेनेने मुंबईतील विकासकामांवर लक्ष केंद्रीत के ले आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पांचा आढावा घेताना सर्व प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्याच्या सूचना प्राधिकरणास दिल्या. त्यासाठी घेतलेल्या बैठकीत एमटीएचएलसह मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक मेट्रो प्रकल्पांच्या कामांची सद्यस्थिती, भविष्यातील नियोजन, निधीची उपलब्धता यासर्व बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

मुंबई आणि नवी मुंबई दरम्यानच्या या २२ किमी लांबीच्या सागरी मार्गामुळे लोकांचा प्रवासाचा वेळ ४०-५० मिनिटांनी वाचणार आहे. या प्रकल्पाचे ३५ ते ४० टक्के काम पूर्ण झाले असून सप्टेंबर २०२३ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्यात येईल असे सादरीकरणादरम्यान सांगण्यात आले. तसेच मुंबईतील सुमारे १४ मेट्रो मार्गिका प्रकल्पाद्वारे ३३७ किलोमीटर लांबीचे मेट्रोचे जाळे निर्माण होणार आहे. त्यावर मेट्रोची कामे अनेक ठिकाणे सुरू असून कामाच्या ठिकाणी पावसाचे पाणी साचणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

एमयुटीपी ३ ए प्रकल्पांतर्गत उपनगरीय रेल्वे सेवांचा विस्तार, उपनगरीय स्थानकांचे आधुनिकीकरण आदी कामांचा समावेश असल्याचे मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक खुराणा यांनी सांगितले.