scorecardresearch

मुंबई : घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार अटकेत

विविध ठिकाणी घरफोडी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला शिवाजी नगर पोलिसांनी अटक केली.

मुंबई : घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार अटकेत
संग्रहित छायाचित्र

विविध ठिकाणी घरफोडी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला शिवाजी नगर पोलिसांनी अटक केली. घरफोडीसाठी वापरण्यात येणारी अवजारे आणि लुटलेला मुद्देमाल पोलिसांनी आरोपीकडून हस्तगत केला.गेल्या काही दिवसांपासून गोवंडीच्या शिवाजी नगर परिसरात घरफोडीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वारंवार तक्रारी येत असल्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा युद्धपातळीवर तपास सुरू केला होता.

हेही वाचा >>> मुंबई : उपमुख्यमंत्री बुधवारी घेणार ‘म्हाडा’च्या कामाचा आढावा

पोलिसांनी परिसरातील सीसी टीव्ही कॅमेराची तपासणी केली असता एक सराईत गुन्हेगार दृष्टीस पडला. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. कचराभूमी परिसरात सोमवारी रात्री गस्त घालणाऱ्या पोलिसांना रमझान अली शेख आढळला. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतले. त्याच्या जवळील बॅगेची झडती घेतली असता पोलिसांना त्यात काही दागिने आणि रोख रक्कम आढळली. तसेच घरफोडीसाठी वापरण्यात येणारी काही अवजारे पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या