राज्यात दसरा मेळाव्यावरून राजकारण रंगले आहे. त्यात कल्याणमध्ये आणखी एक नवीन वादाची ठिणगी पडली आहे. कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर नवरात्र उत्सव कोण साजरा करणार यावरुन दोन्ही गटांनी नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कोणाला परवानगी देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार असून, नवरात्री अगोदर राजकीय गरबा कल्याणात रंगू लागला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

1968 साली कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर पूजा-अर्चना करण्यासाठी बंदीहुकुम जारी करण्यात आले होते. यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सपत्नीक बंदीहुकुम मोडून देवीची पूजा केली. तेव्हापासून आजपर्यंत दरवर्षी दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गाडी देवीचा नवरात्र उत्सव साजरा केला जातो. शिवसेनेच्या नियमाप्रमाणे किल्ले दुर्गाडी देवीच्या नवरात्र उत्सवाचा अध्यक्ष हा शहर प्रमुख असतो. मात्र, यंदा या उत्सवावर देखील शिंदे गट विरुद्ध शिवसेना हे वादाचं सावट आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena and cm eknath shinde group application collector over get permission kalyan durgadi fort navratrotsav rno news ssa
First published on: 22-09-2022 at 10:15 IST