स्वर्गीय आनंद दिघेंनी गद्दारी झाल्यानंतर ठाण्यात काय केलं होतं हे आठवतं का? अशी आठवण शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे गटाला करुन दिली आहे. उद्धव ठाकरे या महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख ठरले. त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात दंगली झाल्या नाहीत याचीच भाजपाला सल आहे असा आरोपही त्यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी केला. आपण बाळासाहेबांचे खंदे समर्थक आहोत असं प्रत्युत्तर उद्धव ठाकरेंना देणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही त्यांनी टीका केली.

एकनाथ शिंदे यांनी आपण बाळासाहेबांचे खंदे समर्थक असल्याचं म्हटलं आहे असं सांगितलं असता अरविंद सावंत म्हणाले “तुमच्यावरील ईडी, सीबीआयच्या केसेस, खुनाचा आरोप याचं काय झालं ते त्यांनी आधी सांगावं आणि नंतर आपण बाळासाहेबांचे समर्थक आहोत म्हणावं. ज्या आनंद दिघेंचं ते नाव घेतात त्यांनी ठाण्यात गद्दारी झाल्यानंतर काय केलं होतं आठवतं का? त्यांनी सर्व नगरसेवकांचे राजीनामे घेतले होते. पाच वर्ष ठाण्यात विरोधी पक्षच नव्हता. एकाने गुन्हा केला म्हणून सर्वांना शिक्षा दिली होते, आज आनंद दिघे असते तर यांच काय झालं असतं विचार करा”.

‘मुंबईवर गिधाडे फिरतायत’ म्हणत अमित शाहांना लक्ष्य करणाऱ्या उद्धव ठाकरेंना भाजपाचं प्रत्युत्तर, म्हणाले “ते गरुड, पेंग्विन प्रमुखांनी…”

“उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देशात अनेक ठिकाणी दंगली झाल्या, पण महाराष्ट्रात झाल्या नाहीत. भाजपाला याचीच सल आहे. त्यामुळे त्यांनी मतांचं ध्रुवीकण सुरु केलं असून महाराष्ट्र हे न कळण्याइतका खुळा नाही. उद्धव ठाकरे या महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख ठरले. महाराष्ट्र कसा एकजूट ठेवावा, सर्व धर्मांचा आदर कसा करावा, सगळ्यांच्या भावना कशा जपाव्यात, महाराष्ट्र पुढे कसा न्यावा हे उद्दव ठाकरेंनी दाखवून दिलं,” असंही ते म्हणाले.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“न्यायालयीन व्यवस्था अजून निर्णय घेत नाही, पोलीसदेखील एकाच बाजूने वागत आहेत. कायदा सुव्यवस्थेची काळजी असेल तर कालपर्यंत ज्यांनी हात पाय तोडेन अशा वल्गना केल्या त्यांच्यावर काय कारवाया केल्या याचं उत्तरही दिलं पाहिजे. त्यासाठीच आम्ही राज्यपालांना भेटलो होतो. राज्य कुठे चाललं आहे? गृहमंत्र्याचं आदेशावरुनच हे सर्व सुरु आहे. म्हणूनच दिल्लीतही हातात कागद घेऊन बोलावं लागतं,” अशी टीकाही अरविंद सावंत यांनी केली.