भाजपाचा रंग बनावट असून त्यांचे रंग भेसळयुक्त आहेत अशी टीका शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांना आम्ही घाबरत नाही याचा पुनरुच्चार त्यांनी केला. तसंच राज्यात पुन्हा भाजपाची सत्ता येणार नाही या शरद पवारांच्या भूमिकेला त्यांनी दुजोरा दिला. भाजपाचे नेते पाठीमागून वार करतात अशी टीका यावेळी त्यांनी केली. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“भाजपाला कोणीही घाबरत नाही. जर भाजपा केंद्रीय तपास यंत्रणा, खोटे आरोप, चिखलफेक करुन महाविकास आघाडीचे आमदार, खासदार, नेते यांचं मनोबल खाली आणण्याचा प्रयत्न करत असतील तर ते चुकीचं आहे, असं होणार नाही. शरद पवार यांनी जो विश्वास दिला आहे की, घाबरु नका मी भाजपा पुन्हा महाराष्ट्रात येऊ देणार नाही ही फक्त राष्ट्रवादी काँग्रेस नाही तर महाविकास आघाडीच्या वतीनेही त्यांनी भूमिका मांडली आहे. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते म्हणून त्यांनी तरुण आमदारांसमोर भूमिका मांडली आहे,” असं संजय राऊत म्हणाले.

शरद पवारांकडून भाजपाचं कौतुक; नेत्यांना म्हणाले “प्रतिस्पर्धी असले तरी त्यांच्यांकडून…”

“भाजपातील आमचे मित्र रोज नव्या तारखा देत रंग उधळत आहेत. हे सर्व नकली रंग असून त्यावर केंद्र सरकारचीही बंदी आहे. त्यांना शरद पवारांनी उत्तर दिलं आहे. काही झालं तरी भाजपा पुन्हा महाराष्ट्रात येणार नाही. लोकशाही आणि राजकारणात प्रयत्न करायला काही हरकत नाही, त्यांनी प्रयत्न करत राहिलं पाहिजे,” असं संजय राऊत म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, “रेड हा त्यांचा आवडता रंग आहे म्हणण्यापेक्षा यात भेसळ आहे. हे भेसळीचे रंग वापरतात. तुमच्या भेसळीच्या रंगाला आम्ही घाबरत नाही. होळी वर्षातून एकदा येते पण यांचा शिमगा रोज सुरु आहे. आम्ही जर शिमगा करायला सुरुवात केला तर महाराष्ट्रातही खूप खड्डे खणले आहेत आणि त्यात कोण पडेल, कोणाला ढकललं जाईल हे दिसेल”.

“महाराष्ट्रातही आपला भगवा….”; फडणवीसांच्या उपस्थितीत नितीन गडकरींचं मोठं विधान

“शिवसेना मोठा पक्ष आहे, शिवसेनेचं आव्हान आहे. ज्याचं आव्हान असतं त्याच्याविरोधात बोंहब मारली जाते. भाजपाच्या दंडात ताकद आहे असं त्यांना वाटत असतं. पण तसं नाही कारण ते पाठीमागून वार करतात. राजकारणात पाठीमागून होणारे हल्ले पचवायचे असतात आणि आम्ही ते पचवत आहोत. ठाकरे सरकारला अडीच वर्ष झाली असून अजून अडीच जातील आणि पुढील पाच वर्ष पुन्हा आम्हीच सत्तेत येणार,” असा विश्वास संजय राऊतांनी यावेळी व्यक्त केला.

महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले “ज्या क्षणी…”

फडणवीसांनी २०२४ मध्ये आम्ही बहुमताने सत्तेवर येणार म्हटल्यासंबंधी विचारलं असता संजय राऊत म्हणाले की, “फार चांगली गोष्ट आहे. गोवा जिंकून आल्यापासून त्यांचं मनोबल वाढलं आहे. गोवा काय आहे हे त्यांना लवकरच कळेल. गोवा पोर्तुगीज आणि इंग्रजांनाही कळला नाही. अनेक राजकीय पक्षांनाही गोवा काय आहे आणि गोव्याचं राजकारण कळलं नाही. गोवा जिंकल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला असेल तर माझ्या शुभेच्छा आहेत. राजकीय कार्यात त्यांनी स्वत:ला वाहून घ्यावं”.

“विधानसभा अध्यक्षपदाचा विषय जटील करण्यात आला. हा घटनात्मक विषय असून त्यानुसार निवडणूक झाल्या पाहिजे. राज्यपालांना फक्त कळवायचं असतं पण सौजन्य असल्याने आम्ही त्यांची परवानगी मागितली,” असं राऊतांनी म्हटलं. महाराष्ट्रात रोज धुळवड सुरु असून ती थांबली पाहिजे. भाजपा नेत्यांनी होळी आणि शिमग्यामधील फरक समजून घ्यावा आणि त्यानुसार रंग उधळावेत असा सल्ला संजय राऊतांनी दिला.

PHOTOS: फडणवीसांचा रोड शो थेट गडकरींच्या घरापर्यंत; म्हणाले “एकहाती सत्ता आणणार”; गडकरी म्हणाले “कामाला लागा”

“सध्याचं राजकारण बिघडवून ठेवलं आहे. महाराष्ट्रातील सुसंस्कृतपणा, राजकारणातील विनोद, संवेदनशील मन नष्ट करुन टाकलं आहे. राज्यात असं वातावरण कधीच नव्हतं. दुर्दैवाने भाजपा नेत्यांनी ते केलं आहे,” अशी खंत संजय राऊतांनी व्यक्त केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena sanjay raut on bjp maharashtra government press conference in mumbai sgy
First published on: 18-03-2022 at 10:29 IST