लोकसत्ता टीम

वर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण म्हणजे विरोधकांचे वाभाडे काढणे आलेच, असे सर्वमान्य मत. त्यातही महाराष्ट्रात आल्यावर ते इतरांसोबतच प्रामुख्याने शरद पवार यांच्यावर टीका करीत असल्याचा उभ्या महाराष्ट्राचा अनुभव सांगितल्या जातो.

What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
What Prakash Ambedkar Said?
प्रकाश आंबेडकरांचा दावा, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं काम संपलं आहे, पुढच्या दोन महिन्यांत…”
revenue minister radhakrishna vikhe sent businessman to me for not to nominate nilesh lanke says sharad pawar
निलेश लंके यांना उमेदवारी देऊ नये म्हणून महसूलमंत्र्यांनी उद्योगपतीला माझ्याकडे पाठवले! शरद पवार यांचा नगरच्या सभेत खळबळजनक दावा
ajit pawar sharad pawar (4)
“२०१४ च्या निवडणुकीचा निकाल यायच्या आधीच…”, अजित पवारांची शरद पवारांवर टीका; म्हणाले “मी पहाटे पाच वाजता…”
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
narendra modi shinde fadnavis reuters
फडणवीसांना डावलून शिंदेंना मुख्यमंत्री का केलं? पंतप्रधान मोदींनी सांगितली भाजपाची रणनीती
pankaja munde manoj jarange (1)
“ही गोपीनाथ मुंडेंची औलाद कधी…”, मनोज जरांगेंवरील कथित टीकेवर पंकजा मुंडेंचा खुलासा

आज तीच अपेक्षा होती. कारण वर्धा मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार आघाडीचा उमेदवार उभा आहे. उपस्थित प्रत्येकास वाटत होते की पंतप्रधान मोदी हे पवार व त्यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर टिकास्त्र सोडल्या खेरीज राहणार नाही. मात्र, मोदींचे भाषणातील शेवटचे वाक्य आटोपले तरी पवार यांच्या विरोधात चकार शब्द निघाला नाही. सभा आटोपल्यावर त्याच मुद्द्याची चर्चा रंगली.

आणखी वाचा-‘चरा चरात वास करणारी गुरुदेव शक्ती’ पंतप्रधान नरेंद्र मोदी असे का म्हणाले…

मोदींनी पवारांना का सोडले, यावर चर्वीतचर्वण सूरू आहे. मात्र हे असे का यावर बोलतांना एक काँग्रेस नेता म्हणाला की ज्यांच्यावर भ्रष्टाचारचे आरोप केले त्या अजित पवार यांना सोबत घेतले तर मग शरद पवार यांच्या विरोधात कसे व काय बोलणार असा प्रश्न त्यांना कदाचित पडला असेल. एक तेवढेच खरे की ही सभा या ठिकाणी पवारांचा उमेदवार असूनही त्यांच्यावर टीका न करता पार पडली याची नोंद कायम राहील, असे पवार समर्थक एक ज्येष्ठ नेता म्हणाला.

भाजपचा एक ज्येष्ठ संघटन पुढारी म्हणाला की अनुल्लेखाने मारणे असे म्हटल्या जाते. उल्लेख करीत पवार यांना मोठा शत्रू मानण्यापेक्षा तो न केलेलाच बरे, असे असू शकते. इथे सभा घेऊन पवार यांच्या उमेदवाराचे (अमर काळे आर्वीचे )आव्हान मान्य केल्याची बाब नमूद होवू नये, असा तर्क या नेत्याने व्यक्त केला.