शिवसेना खासदार संजय राऊत आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार असून संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. संजय राऊत यांनी या पत्रकार परिषदेत आपण मोठे खुलासे कऱणार असल्याचं जाहीर केलं असून यावेळी ते काय सांगतात याची उत्सुकता आहे. काय उखडायचं ते उखडा, बघु कोणात किती दम आहे, असं म्हणत त्यांनी भाजपाला खुलं आव्हान दिलं असून पुढील काही दिवसात भाजपाचे साडेतीन लोक अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील आणि अनिल देशमुख बाहेर असतील, असा इशारा दिला आहे. दरम्यान या पत्रकार परिषदेआधी त्यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मी आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. कधीतरी शिवसेनेची पत्रकार परिषदही ऐका. सौ सोनार की, एक लोहार की…,” असं राऊत यावेळी म्हणाले. किरीट सोमय्यांच्या आरोपांबाबत विचारलं असता त्यांनी बोलणं टाळलं.

काही दिवसात भाजपाचे साडेतीन लोक अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील आणि… : संजय राऊत

संजय राऊत यांना यावेळी ईडीकडून सुरु असलेल्या धाडींबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “माझ्याकडे माहिती नाही. जर राष्ट्राच्या सुरक्षेसंदर्भात काही विषय असतील, काही गंभीर गोष्टी असतील आणि केंद्राकडे तशी काही माहिती असेल तर केंद्रीय तपास यंत्रणांना सहकार्य करणं गरजेचं आहे. यासंबंधी आपण जास्त बोलू नये. कारवाई सुरु असेल तर राज्य आणि केंद्र सरकराने एकत्रित काम करायला हवं”.

संजय राऊतांच्या भाजपाचे लोक जेलमध्ये असतील दाव्यावर आदित्य ठाकरेंचं मोठं विधान; म्हणाले “आत्ताशी टॉस…”

यामध्ये काही राजकीय नेत्यांची नावं येत असल्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “मला माहिती नाही. नावं समोर येतील की घुसवली जातील हा महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडमध्ये मोठा प्रश्न आहे. पण त्याच्यावर मी आता बोलणार नाही. राष्ट्रीय सुरक्षा, एकात्मता हा नाजूक आणि गंभीर विषय असतो. तपास सुरु असताना त्यावर जास्त बोलण्याची गरज नाही”.

“गुजरातमध्ये देशातील सर्वात मोठा बँक घोटाळा झाला आहे. ईडी तिथे कधी जाणार याची वाट पाहत आहोत. दोन वर्षांपासून हा घोटाळा दाबण्याचा कोणी प्रयत्न केला? एफआयआरदेखील होऊ दिला नाही. ईडीने तिथेही जाऊन ते लोक कोण होते, आरोपींना पळून जाण्यास मदत करणारे कोण? याचा तपास केला पाहिजे,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena sanjay raut press conference ed mumbai raid shivsena bhavan bjp sgy
First published on: 15-02-2022 at 10:56 IST