शिवसेनेतील बंडखोरीनंतर बंडखोर एकनाथ शिंदे गट आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे समर्थकांच्या गटामध्ये राजकीय कुरघोड्या सुरू आहेत. अशातच दोन्ही गट आपआपल्या समर्थकांच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शनही करत आहे. ठाकरे गटाने राज्यभरात संघटनात्मक पातळीवर मेळावे घेत संपर्क अभियानाला वेग दिलाय. अशातच आता ठाकरे समर्थक गटाकडून सोशल मीडियावर आणखी एक मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेत शिवसैनिकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावरील प्रोफाईल फोटो बदलण्याचं आवाहन केलं जात आहे. सोबत एक फोटोही शेअर केला जातोय.

शिवसेनेकडून सोशल मीडियावर शिवसैनिकांना एक मेसेज पाठवला जात आहे. यात म्हटलं आहे, “महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकणार नाही, महाराष्ट्र विकणार नाही. केंद्रीय यंत्रणेच्या मदतीने दिल्लीत बसलेले सरकार आपल्या महाराष्ट्रावर कुरघोडी करण्याचे प्रयत्न करत आहे, पण महाराष्ट्राचे लढवय्ये मावळे हे मनसुबे उधळून लावतील. आपणा सर्वांना एक विनंती आहे की, शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात सर्वांनी सामाजिक माध्यमांवर (फेसबुक, ट्विटर, Whatsapp, इत्यादीवर) आपला प्रोफाईल पिक्चर (डीपी) बदलावा.”

हेही वाचा : Photos : हेच ते ४० बंडखोर आमदार, कुणाची संपत्ती किती, कोणते गुन्हे दाखल? वाचा सविस्तर…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आपण सर्वांच्या एकजुटीने आपण दाखवून देऊया की महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकणार नाही, महाराष्ट्र विकणार नाही. जय महाराष्ट्र,” असं या पोस्टमध्ये सांगण्यात येत आहे.